Rohit Pawar: पवार कुटुंब एकत्र येऊ नये ही 'त्या' एकाची इच्छा! पडद्यामागं कोण करतंय काम? रोहित पवार थेट नाव फोडणार

Pawar Family Reunion: 'ठाकरे कुटुंब एकत्र आले, तर स्वागतच. पण पवार कुटुंबही एक असल्याचे मत ठामपणे आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले.
rohit pawar
rohit pawargoogle
Published On

ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानंतर पवार कुटुंबात काका - पुतण्याचं पुन्हा मनोमिलन होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच 'ठाकरे कुटुंब एकत्र आले, तर स्वागतच. पण पवार कुटुंबही एक असल्याचे मत ठामपणे आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले. तसंच, 'पवार कुटुंब एकत्र न येण्यासाठी ज्या कुणाचे प्रयत्न सुरू आहेत, त्याचे नाव लवकरच उघड करू.', असं देखील रोहित पवारांनी सांगितले. त्यांनी केलेल्या या इशारावजा टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

साहेब आणि दादा ठरवतील

पवार कुटुंब एकत्र येणार का? या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, 'संस्कारात कुटुंब म्हणून एकत्र राहणं महत्त्वाचं आहे. पण काही प्रवृत्ती फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कुटुंबं फोडण्याचं काम करत असतात. अशा प्रवृत्तीविरोधात लढणं, हीच खरी शिकवण आहे,' असं ठामपणे सांगत रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

rohit pawar
Sangli: शेतातील झाडावरच लिंबू, काळी बाहुली, दोरा अन् टाचण्या; सांगलीत नेमकं चाललंय तरी काय?

तसेच 'पवार कुटुंबाचं राजकीय एकत्रीकरण ही जनतेची भावना असली तरी, 'साहेब आणि दादा' जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत कुणाच्याही इच्छा फोल ठरणारच', असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

rohit pawar
Beed News: डोक्यावर कर्जाचा डोंगर, कंटाळून शेतकऱ्यानं झाडालाच गळफास घेत आयुष्य संपवलं; बीडमध्ये हळहळ

आज नाही, पण एक दिवस नाव घेईन

'कुटुंब एकत्र येऊ नये यासाठी कुणीतरी काम करतंय का?' या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवारांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, "आज नाही, पण एक दिवस मी नाव घेईन!" अशी इशारावजा टिप्पणी रोहित पवार यांनी केली. पवार यांनी दिलेल्या सूचक प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

rohit pawar
Solapur Crime: बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात डॉक्टरचा मृतदेह, बाजूला चाकू अन् कात्री; आत्महत्या की हत्या? मृत्यूचं गूढ वाढलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com