Beed News: डोक्यावर कर्जाचा डोंगर, कंटाळून शेतकऱ्यानं झाडालाच गळफास घेत आयुष्य संपवलं; बीडमध्ये हळहळ

Farmer Killed himself in Beed Due to Debt: एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.
Beed
BeedSaam
Published On

राज्यात शेतकरी अजूनही कर्जबाजारीला कंटाळून स्वत:चं आयुष्य संपवत आहेत. अशीच एक घटना बीड जिल्यात घडली आहे. एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आर्थिक अडचण आणि मानसिक तणावाचा सामना करत होते. याच कर्जाबाजारीपणाला कंटाळून त्यांनी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या दुर्देवी मृत्यूनंतर परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव विठ्ठल साखरे असे आहे. त्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी स्वत:ला संपवलं. विठ्ठल बीडच्या माजलगाव तालुक्यातील शहाजनपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विठ्ठल आर्थिक अडचणींचा सामना करत होते. तसेच उदरनिर्वाहासाठी पुरसे पैसेही नव्हते.

Beed
Mhada Lottery: दिवाळीपूर्वी हक्काचं घर होणार! म्हाडा वर्षभरात राज्यात १९,४९७ घरे बांधणार; मुंबईकरांना विशेष फायदा

शिवाय विठ्ठल यांच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर देखील होतं. त्यामुळे ते अनेक दिवसांपासून मानसिक तणावात होते. याच त्रासाला कंटाळून त्यांनी सोमवारी रात्री आपल्या शेतात जाऊन एका झाडाला गळफास घेतला. मंगळवारी (२९ एप्रिल) सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला पाहुन कुटुंबाला धक्काच बसला.

Beed
'दहशतवाद्यांना धर्म विचारायला वेळ नाही, सरकार लोकांना भरकटवतंय', काँग्रेस नेत्याचा आरोप; फडणवीस म्हणाले 'जखमेवर मीठ..

यानंतर गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. तसेच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com