मयुर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी
Mumbai BEST bus Accident : कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या अपघातामध्ये ९ जणांचा जीव गेला होता. चालकाच्या चुकीमुळे बेस्ट बस अपघात झाल्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची लाट होती. हे प्रकरण शांत झाले नाही, तोच आणखी एक अपघाताची घटना घडली आहे. सुदैवाने बेस्ट बसच्या या अपघातामध्ये कुणाचाही मृत्यू झाला नाही, पण चालक बेस्ट बस सुरू ठेवून गेला होता, त्याचवेली बस अचानक धावली. थोडक्यात मोठी दुर्घटना टळली, यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कन्नमवार नगर बस स्थानकात हा प्रकार घडलाय. बस अचानक धावू लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
बेस्ट बस सुरू ठेवून चालक नियंत्रण कक्षात गेला. अचानक बस सुरू झाली, त्या बसने दोन जणांना उडवलं. आज सकाळी ११ वाजताच्या आसपास ही घटना घडली. मुंबईच्या कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकात बस चालकाचा अजब प्रकार समोर आलाय. चालक बेस्ट बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला. त्यानंतर बस अचानक सुरू झाली. बेस्ट बसने वेग घेतला अन् समोर असलेल्या चहाच्या टपरीला धडक दिली.
कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकात चालकाच्या चुकीमुळे बेस्ट बसने चहाच्या टपरीला धडक दिली. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल कऱण्यात आलेय. सुदैवाने आज सुट्टीचा दिवस असल्याने मोठी दुर्घटना टळली. या ठिकाणी बस प्रवाशांची तसेच चाकरमान्यांची बस आणि रिक्षा पकडण्यासाठी मोठी गर्दी असते, याच भागात महाविद्यालय देखील आहे, पण आज सुट्टी असल्याने लोक नव्हते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.