Kurla Best Bus Accident: बस अपघात प्रकरणी मोठी अपडेट! चालक दारू प्यायला होता का? सत्य आलं समोर

Kurla Best Bus Accident Big Update : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. चालक संजय मोरे यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला असून त्यातून मोठा खुलासा झालाय. अपघातावेळी चालकाने दारू प्यायली होती का? असा सवाल विचारला जात आहे.
Kurla Best Bus
Kurla Best Bus Accident Big UpdateGoogle
Published On

मुंबईकरांची धडकी भरणारा बेस्ट बसच्या अपघाताप्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बस अपघातात ७ जणांना आपला जीव गमवावा लागला झाला होता. तर ४९ जण यात जखमी झालेत. हा अपघात कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे. तर चालकाने मद्य सेवन केलं असल्यानेच अपघात झाला असावा, असा संशय वर्तवला जाता होता. याप्रकरणी फॉरेन्सिक अहवालातून मोठी माहिती समोर आलीय. बस चालकाचे नाव संजय मोरे असून त्याने अपघातावेळी दारू प्यायली असावी असा अंदाज अनेकांनी वर्तवलाय. याप्रकरणी मोठी माहिती समोर आलीय.

अपघात प्रकरणी मोठा खुलासा

कुर्ला पश्चिम येथे ९ डिसेंबर रोजी रात्रीच्या ९ ते १० वाजण्याच्या सुमारास भरधाव बेस्टचा अपघात झाला होता. भरधाव बेस्ट बस थेट मार्केटमध्ये घुसत ७ जणांना चिरडलं. तर या अपघातात ४९ जण जखमी झाले. याप्रकरणी बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याची वैद्यकीय तपासणी सुद्धा केली गेली आहे. कुर्ला बेस्ट बसचा अपघात झाला तेव्हा बसची गती किती होती याची याचा तपास केला जात आहे.

बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) बसचा वेग ताशी ४६ किमी होता, असं सांगितलं जात आहे. तर बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. अशात चालकाचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला असून यात मोठा खुलासा झालाय.

Kurla Best Bus
Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची आणि जखमींची नावं आली समोर, वाचा संपूर्ण लिस्ट

व्हिडिओ व्हायरल

बेस्ट बस इतक्या वेगाने मार्केटमध्ये घुसण्यामागे अनेक असण्याची शक्यता आहे. त्यात अनेकांना शंका आहे की, बस चालकाने मद्य सेवन केलं असावं. त्याचमुळे ही दुर्घटना घडली असावं म्हटलं जात आहे. दरम्यान बेस्ट बसचा अपघात झाल्यानंतर बेस्ट चालक अनेकांच्या रडारवर आले. त्यानंतर काही बेस्ट बस चालकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यात एका व्हिडिओ मध्ये एक बस चालक दारूच्या दुकानातून दारू घेऊन बाहेर पडत असल्याचं दिसला.

Kurla Best Bus
Kurla Bus Accident : कुर्ला बस अपघात प्रकरण; संजय मोरेचा कबुली जबाब, केला धक्कादायक खुलासा|VIDEO

दारू प्यायला होता चालक ?

असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना कुर्ल्यातील बस अपघातातील बस चालकानेही दारूचे सेवन केलं असेल असा शंका अनेकांनी उपस्थित केली होती. त्याबाबत नवा रिपोर्ट आलाय. या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, बस चालकाने कोणत्याच प्रकारची दारू प्यायली नसल्याचं समोर आलंय. अपघाताच्या वेळी संजय मोरे दारू प्यायला नसल्याच अहवालात नमूद करण्यात आलंय.

चालकाला संतप्त नागरिकांकडून मारहाण

या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बसच्या चालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या अपघातानंतर चालक संजय मोरे (५४ वर्षे) याला पोलिसांनी अटक केलीय

बसचा वेग आपोआप वाढू लागला

अपघातानंतर चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय मोरेने पोलीस चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती दिली. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. बसचा वेग आपोआप वाढू लागला आणि ब्रेक फेल झाल्याचा दावा चालकाने पोलिसांसमोर केला होता.

बसमध्येच काही तरी फॉल्ट असेल- चालकाची पत्नीचा दावा

आरोपी बस चालक संजय मोरे यांच्या पत्नी मनिषा मोरे यांनीही अपघात प्रकरणी बसला दोष दिलाय. 'माझ्या नवऱ्याने जवळजवळ ३० ते ३५ वर्ष ड्रायव्हिंगचे काम केलंय. जुन्या कंपनीमध्ये त्यांनी अनेक चांगल्या फोर व्हिलर चालवल्या. माझ्या नवऱ्याचा बेस्ट बॅच देखील खूप जुना आहे. त्यांनी बेस्टमध्ये छोट्या बस ३ वर्षे चालवल्या आहेत.

'या मोठ्या बसची त्यांना ट्रेनिंग दिली आहे. त्याच्यानंतर १ डिसेंबरपासून ते जॉईन झालेत. काल गाडी हातात घेतली आणि ठोकली असं काहीही विषय नाही. उगाच त्यांच्या नावाची बदनामी करू नका. आपला आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मनिषा मोरे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com