CCTV cameras installed inside a residential lift as Mumbai police investigate a privacy breach after a private video allegedly leaked from a housing society system. Saam Tv
मुंबई/पुणे

लिफ्टमध्येच बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट झाली, KISS करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मुंबईतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Mumbai Andheri Lift CCTV Video Leak Case: मुंबईतील अंधेरी भागात लिफ्टमधील खासगी क्षणाचा CCTV व्हिडिओ व्हायरल झाल्याने 36 वर्षीय महिलेने साकीनाका पोलिस ठाण्यात FIR दाखल केली. सोसायटीच्या CCTV प्रणालीच्या गैरवापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Omkar Sonawane

मुंबईच्या अंधेरी भागात गोपनीयतेचा गंभीर भंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 36 वर्षीय एका महिलेने आपल्या राहत्या इमारतीतील लिफ्टमध्ये एका पुरुष मित्रासोबत घालवलेला खासगी क्षणाचा व्हिडिओ लीक होऊन व्हायरल झाल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. ही घटना जानेवारी 2026 मध्ये घडली होती, मात्र 9 मार्च रोजी हा व्हिडिओ सोसायटीत व्हायरल झाल्याचे तिला लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला हा प्रकार तेव्हा समजला जेव्हा सोसायटीतील काही रहिवासी तिची सार्वजनिक ठिकाणी खिल्ली उडवत होते आणि त्या विशिष्ट व्हिडिओचा उल्लेख करत होते. ती ज्यावेळी घरातून बाहेर पडायची तिला बघताच सोसायटीमधील मुले तिच्याकडे बघून हसायची आणि टिंगल टवाळखी करायचे.

यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने संबंधित महिलेने साकीनाका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात पोलिसांना संशय आहे की सोसायटीच्या सीसीटीव्ही बॅकअपची जबाबदारी असलेल्या व्यक्तीनेच हे फुटेज मिळवून ते पसरवले असावे. महिलेच्या तक्रारीनुसार, हा व्हिडिओ केवळ सोसायटीतील ग्रुपमध्येच नव्हे तर सोसायटीबाहेरील लोकांनाही पाठवण्यात आला, ज्यामुळे तिला मोठा मानसिक त्रास आणि सामाजिक अपमान सहन करावा लागला आहे. या प्रकरणामुळे सोसायट्यांमधील सीसीटीव्ही यंत्रणेच्या गैरवापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फुटेज लीक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT