Kolhapur News: कोल्हापूरच्या रस्त्यावर फिरतायत मगरी, 15 फुटांच्या मगरीनं भीतीचं वातावरण, ऊसतोडणी मजूरांमध्ये दहशत

Kolhapur Crocodile News: एका बाजूला ऊस तोडणीचा हंगाम... दुसऱ्या बाजूला रात्रीच्या अंधारात मृत्यूची टांगती तलवार, अशी परिस्थिती झालीय कोल्हापूरातल्या शेतकऱ्यांची...कारण कोल्हापूरच्या रस्त्यावर दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Kolhapur Crocodile News
Kolhapur Crocodile NewsSaam Tv
Published On: 

Kolhapur Crocodile News: एका बाजूला ऊस तोडणीचा हंगाम... दुसऱ्या बाजूला रात्रीच्या अंधारात मृत्यूची टांगती तलवार, अशी परिस्थिती झालीय कोल्हापूरातल्या शेतकऱ्यांची...कारण कोल्हापूरच्या रस्त्यावर दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. नेमकं प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

कोल्हापूरमध्ये सध्या मगरींची दहशत पसरलीय...दिवसा शेतात आणि रात्री थेट रस्त्यावर मगरी फिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतचं वातावरण पसरलंय. कोल्हापूरच्या खोची दुधगावच्या रस्त्यावरील पुलाजवळ दररोज या महाकाय मगरीचं दर्शन होत असल्याचं शेतकरी आणि प्रवाशांनी सांगितलयं...रस्त्यावर मगर आली की वाहनांची चाकं थांबतात... आणि मगर बाजूला जाईपर्यंत प्रवाशांना पुढे जाता येत नाही. दुसरीकडे सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने रात्रीच्या वेळी ऊसतोडणी कामगारांची या परिसरात ये-जा सुरू असते. अंधारात अचानक मगरीशी सामना झाला तर काय होणार, हा प्रश्न कामगारांसह शेतकऱ्यांना सतावतोय...

Kolhapur Crocodile News
Sara Tendulkar: सारा तेंडुलकर होणार सनी देओलची सून? सारा-राजवीर अडकणार विवाहबंधनात? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

मगरीच्या भीतीने महिला शेतमजूर आणि शेतकऱी शेताकडे जाणंही टाळतात. त्यामुळे शेतीच्या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. एखादी जीवघेणी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Kolhapur Crocodile News
Maharashtra Farmer: पोट भरण्यासाठी शेतकरी APMC बाजारात, दुष्काळग्रस्तांचे हाल, बळीराजा झाला हमाल

रस्त्यावर आणि शेतात मगरीचा वावर असल्यानं ऊसतोडणी मजूर जीव मुठीत धरून काम करतायत..आता दुधगाव परिसरातील या गंभीर परिस्थितीकडे वनविभाग वेळीच लक्ष देऊन मगरीना सुरक्षित स्थळी कधी हालवणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलयं...

रणजीत माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.