Sara Tendulkar: सारा तेंडुलकर होणार सनी देओलची सून? सारा-राजवीर अडकणार विवाहबंधनात? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Sara Tendulkar Wedding : सनी देओलचा मुलगा आणि सारा तेंडुलकर विवाहबंधनात अडकणार असल्याचा मेसेज व्हायरल केला जातोय...पण, या दाव्यात खरंच तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात..
 Sara Tendulkar Wedding
Sara Tendulkar WeddingSaam TV
Published On: 

Sara Tendulkar Wedding : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि सनी देओलचा मुलगा राजवीर देओल हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे...सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाची चर्चा जोर धरतेय...दोघांचे फोटोही व्हायरल होतायत...त्यामुळे खरंच दोघं लग्न करणार आहेत का...? दोघांचेही सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत...त्यामुळे अनेकांना याबाबत उत्सुकता लागलीय...आम्हीही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर, सनी देओलचा मुलगा राजवीर देओलशी लग्न करणार आहेत. लग्न 2027 मध्ये होऊ शकतं. हा मेसेज व्हायरल होत असल्याने याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने साराचे आणि राजवीरचे सोशल मीडिया हॅन्डल तपासले... मात्र, त्यांचे फोटो, आम्हाला कुठेही सापडले नाहीत... तसेच त्यांनी याबाबत पोस्ट केल्याचंही आढळलं नाही... मग दोघं लग्न करणार आहेत हे कुणी सांगितलं...? याची अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही काही मॅगझिन्स, वृत्तपत्रंही तपासली... त्यावेळी काही वृत्तपत्रांमध्ये सारा आणि राजवीरच्या लग्नाच्या चर्चेबाबत माहिती मिळाली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

 Sara Tendulkar Wedding
Eetha movie: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास; 'जी जी रे जी' गाण्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

सारा तेंडुलकर आणि राजवीर देओलच्या लग्नाची अफवा आहेत. सारा आणि राजवीर दोघे कधीही भेटलेले नाहीत. तेंडुलकर देओल कुटुंबाकडून लग्नाबाबत कोणतीही घोषणा नाही. राजवीर हा अभिनेता असून सध्या चित्रपटात काम करतो

 Sara Tendulkar Wedding
Pakistani Series Ban in India: नेटफ्लिक्स इंडियावरील पाकिस्तानी वेब सीरिज वादात; भारतात बंदीसाठी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

याआधीही साराच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या...क्रिकेटर शुभमन गिलसोबत तिचं अफेअर्स असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या...मात्र, त्याही चर्चा खोट्या ठरल्या...साराने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं असून, सध्यातरी तिने लग्नाचा विचार केला नसल्याचं माहिती मिळतेय...त्यामुळे आमच्या पडताळणीत सारा तेंडुलकर सनी देओलची सून होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.