मोठी बातमी! सरकारनं बोलावलं विशेष अधिवेशन; 30 नोव्हेंबरला लोकसभा, २ डिसेंबरला राज्यसभेचं कामकाज, डिलिमिटेशनच्या मुद्द्याची चर्चा?

Parliament Schedule Announced: संसदेचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने विनंती केली आहे. त्यानुसार लोकसभेची बैठक ३० नोव्हेंबरला, तर राज्यसभेची बैठक २ डिसेंबरला होणार आहे.

सरकारनं मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे. संसदेचं कामकाज पुन्हा सुरू होणार आहे. लोकसभेत ३० नोव्हेंबरला, तर राज्यसभेचं कामकाज २ डिसेंबरला होणार आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं...आता हे एकेक दिवसाचं अधिवेशन डिलिमिटेशनसाठी बोलावण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.

सरकारनं लोकसभा आणि राज्यसभा अशा संसदेच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहांमध्ये बैठक बोलावण्यात यावी, अशी विनंती दोन्ही सभागृहांच्या सभापतींना केली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी ही माहिती दिली. दोन्ही सभागृहांमध्ये वेगवेगळ्या तारखांना बैठका होत आहेत. कामकाजाच्या आवश्यकतेनुसार दोन्ही सभागृहांच्या बैठका ३ डिसेंबरपर्यंत घेतल्या जाऊ शकतात, असेही रिजिजू यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.