संजय गदडे, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : इंडीड जॉब या वेब पोर्टलवरील प्रोडक्शन मॅनेजर पदासाठीची जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, असं म्हटलंय. या जाहिरातीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडीड जॉबची जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाली आहे. या जाहिरातीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहेत.
मुंबईच्या मरोळ एमआयडीसी येथील आर्या गोल्ड या कंपनीत प्रोडक्शन मॅनेजरची जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, या जाहिरातीत मराठी माणसाने अर्ज करु नये, असे म्हटल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता यानंतर कंपनीला उपरती झाल्यानंतर शहरातील बदल केला असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील एका कंपनीने काही महिन्यांपूर्वी एका जाहिरातीत ग्राफिक डिझायनरची जागेसाठी मराठी माणूस नको, असं म्हटलं होतं. मराठी माणसांना डावलणाऱ्या जाहिरातीने मोठा वाद निर्माण झाला होता. लिंक्डिनवरील ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यासारखा आणखी एक प्रकार समोर आला आहे. या जाहिरातीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुंबईतील अंधेरी परिसरातील कंपनीने मराठी कामगारांना नकार दिल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अंधेरीतील कंपनीसाठी दिलेल्या जाहिरातीत नो महाराष्ट्रीयन असा उल्लेख करण्यात आला आहे. नो महाराष्ट्रीयन म्हणणाऱ्या या कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर पदासाठी माणूस हवा आहे. मात्र, या जागेवर मराठी माणूस नको असल्याचे समोर आले आहे. अंधेरीतील आर्या गोल्ड कंपनीची जाहिरात सर्वत्र व्हायरल झाली आहे. या जाहिरातीनंतर या कंपनीवर संताप व्यक्त करण्यात येत आहेत. या जाहिरातीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाली की, 'या कंपनीने तातडीने जाहिरात मागे घ्यायला हवी. राज ठाकरेंचा स्पष्ट आदेश आहे की, हात जोडून नाही तर हात सोजून बोलावं. मराठी माणसांच्या विरोधात षडयंत्र होत असेल तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भेटा. या लोकांना फटकून काढलं पाहिजे. येथे खायचं, राहायचं आणि कमावयचं. त्यानंतर येथील लोकांना विरोध करायचा. त्यानंतर म्हणतात की, मनसे माऱ्यामाऱ्या करतात'.
मनसे नेते अमेय खोपकर म्हणाले की, 'मध्यंतरी ही थेरं बंद झाली होती. मात्र आता परत हे सुरु झालं असेल तर मनसेचे कार्यकर्ते कान चेक करतील. महाराष्ट्रात राहून मराठी माणसांवर अन्याय होत असेल तर मराठी माणसांसाठी आम्ही आवाज उठवतो. आज त्यांच्या कानाखाली आवाज उठेल'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.