ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दुधावरील साय ही त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते, परंतु त्याचे काही नुकसान देखील आहेत.
अत्यंत तेलकट त्वचेवर साय लावल्याने त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात, ज्यामुळे पिंपल्स येऊ शकतात.
काही लोकांना सायमुळे अॅलर्जीची किंवा त्वचेची जळजळ होऊ शकते, विशेषतः ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे त्यांना.
साय जास्त प्रमाणात चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चिपचिपी बनू शकते.
चेहऱ्यावर आधीपासूनच पिंपल्स किंवा जळजळ असेल तर, साय लावल्याने पिंपल्स अधिक वाढू शकतात.
मलईमध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड काही लोकांच्या त्वचेसाठी खूप तीव्र असू शकते, ज्यामुळे त्वचेवर लालसरपणा किंवा त्वचा सोलवटण्याची समस्या उद्भवू शकते.
दुधावरील साय जर ताजी नसेल तर, त्वचेवर फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.