ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरच्या घरी तयार केलेलं लोणी हे शुद्ध, चविष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. यामध्ये कोणतेही केमिकल्स नसतात. घरचं लोणी पोळी, भाजी किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता.
घट्ट साय (मलई), थंड पाणी, मिक्सर किंवा रवी आणि स्वच्छ भांडे इ. साहित्य लागते.
रोज दूध उकळल्यानंतर थंड झाल्यावर त्यावर येणारी साय एका भांड्यात वेगळी काढून ठेवा. ही साय रोज गोळा करून फ्रीजमध्ये ठेवावी. ५ ते ६ दिवसांत पुरेशी साय जमा होईल.
लोणी करण्याआधी गोळा केलेली साय फ्रीजमधून बाहेर काढून नॉर्मल तापमानावर ठेवा. खूप थंड साय असेल तर लोणी पटकन निघत नाही.
आता जमवलेली साय एका मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात थोडं थंड पाणी घाला आणि फिरवून घ्या. साय मिक्सरमध्ये लावल्यावर जास्त पण पाणी टाकू नका, नाहितर लोणी नीट बनणार नाही.
मिक्सर १ ते २ मिनिटं फिरवा. हळूहळू साय फुटून लोणी वेगळं होऊ लागतं. वर पिवळसर लोणी आणि खाली ताक दिसू लागतं.
लोणी वर तरंगताना दिसल्यावर हाताने किंवा चमच्याने ते वेगळं काढा. ताक वेगळ्या भांड्यात काढून ठेवा, ते सुध्दा पिण्यासाठी वापरता येतं किंवा त्याची कढी बनवली जाते.
लोणी २ ते ३ वेळा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे उरलेले ताक पूर्णपणे निघून जाते आणि लोणी जास्त काळ टिकून राहते.
तयार झालेले लोणी हवाबंद डब्यात नीट फ्रीजमध्ये ठेवून द्या. हे लोणी पोळी, पराठा आणि तुप बनवण्यासाठी वापरता येतं. घरचं लोणीची चव आणि आरोग्यासाठी चांगले असते.