ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मकर संक्रांती म्हणजे गोडवा आणि प्रेम वाटण्याचा सण. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला या परंपरेनुसार खास मेजवानीची सुरुवात केली जाते.
संक्रांतीचा खास प्रसाद म्हणजे तिळगूळाचे लाडू. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ शरीराला उष्णता देतात आणि हिवाळ्यात तिळ हे आरोग्यसाठी फायद्याचे मानले जातात.
संक्रंतीला बहुतेकांच्या घरी गुळाच्या पुरणाने भरलेली मऊसूत पुरणपोळी ही केली जाते. पुरणपोळी ही तूपासोबत खाल्ल्यावर चव आणखीनच दुप्पट होते.
संक्रांतीच्या दिवशी भोगीच्या भाजीला खुप महत्त्व असते. हिरव्या भाज्यांची एकत्र मिळून केली जाणारी भाजी म्हणजे भोगीची भाजी. हि भाजी पौष्टिक, स्वादिष्ट आणि पारंपरिक मानली जाते.
हिवाळ्यात उष्णता देणारी बाजरी आणि ज्वारीची भाकरी संक्रांतीच्या जेवणात नक्कीच बनवा.
ताजे काकडी, बीट आणि गाजर यांची कोशिंबीर ही हलकी आणि आरोग्यासाठी उपयुक्त अशी मेजवानीतील साईड डिश म्हणून ओळखले जाते.
वरण भात हा प्रत्येक जेवणाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. साधा पण स्वादिष्ट वरण-भात संक्रांतीच्या जेवणात असायलाच हवा.
तोंडी लावायला तीळ, लसूण आणि मिरचीपासून तयार केलेली तिळाची चटणी भाकरीसोबत अप्रतिम लागते. ही चटणी हिवाळ्यात शरीराला ऊर्जा देते.
पापड, लोणचे, लिंबू, कांदा आणि मीठ हे तुम्ही ताटात बाजूला ठेवू शकता. तसेच पुरणरोळी व्यतिरिक्त आणखीन काही गोड हवे असेल तर ताटात तुम्ही श्रीखंड ठेवू शकता.