महाराष्ट्र हादरला! नवऱ्याने आधी बायकोला दगडाने ठेचून मारलं, त्यानंतर विष प्यायला; ४ निरागस मुले पोरकी
गणेश शिंगाडे, साम टीव्ही
गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील रुपिनगट्टा येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. कौटुंबीक वादातून पतीने पत्नीची दगडावर डोके ठेचून हत्या केली. त्यानंतर स्वतः विष प्राशन करीत आत्महत्या केली. राकेश सुकना कुजूर (३७) व कलिष्टा राकेश कुजूर (३२) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आईवडिलांच्या मृत्यूमुळे चार निरागस बालकांचे भवितव्य अंधारमय झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
राकेश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची माहिती आहे. या संशयातून तसेच घरातील क्षुल्लक गोष्टीवरुन पती पत्नीत नेहमीच भांडण होत होते. शेतावरुन परत येत असतांना दोघांचे प्रचंड कलिष्टा कुजूर राकेश कुजूर झालेल्या त्याने पत्नी कलिष्टाचे केसं ओढत नेत दगडावर डोके आपटून तिची हत्या केली. रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह घटनास्थळी सोडून तो परत शेताकडे आला. अशातच आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाल्याने त्यानेही शेतातच विष प्राशन करुन आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविण्यात आहे.
गावापासून काही अंतरावर गागीरमेटा डोंगर परिसरात दुपारच्या सुमारास कनिष्ठाचे रक्ताने माखलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले. घटनास्थळ दगडावर रक्तस्त्राव दिसून आल्याने दगडावर डोके ठेचून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. मात्र राकेश आढळून न आल्याने हत्येनंतर तो पसार झाल्याचे समजून त्याचाही शोध ग्रामस्थांच्या वतीने घेतला जात होता. दरम्यान राकेशच्या शेतातच त्याचा मृतदेह सुद्धा नागरिकांना दिसून आला
या दाम्पत्यांना मानवी राकेश कुजूर (१२), मेहमा राकेश कुजूर (९), आर्णव राकेश कुजूर (७) शालिनी राकेश कुजूर (५) अशी तीन मुली व एक मुलगा आहे. आईवडील दोघांचाही मृत्यू झाल्याने चारही निरागस मुले पोरकी झाली आहेत. घरातील कर्तेधर्ते सोडून गेल्याने वृद्ध आजोबा सुकना यांच्यावर चारही नातवंडाची जबाबदारी येऊन ठेपली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
