निवडणुकीनंतर भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह,राजकीय वर्तुळात खळबळ

bjp leader rajiv kumar death : भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. या नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला.
BJP party
BJPSaam tv
Published On
Summary

बिहार विधानसभा निवणुकीनंतर धक्कादायक घटना उघडकीस

भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्य

भाजप नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप नेते राजीव कुमार यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. हाजीपूर शहरातील नवीन सिनेमा रोड येथील घरात राजीव यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला आहे. राजीव यांची गळा दाबून हत्या केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

BJP party
'अंडरवेअर'ने घोळ केला, सत्ताधारी आमदार तुरूंगात गेला; खुर्चीही गमावली , नेमकं काय घडलं?

राजीव कुमार यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकारी सुबोध कुमार हे कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढवला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या आणि आत्महत्येच्या दिशेने तपास सुरू आहे. गळा दाबल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीत दिसत आहे.

BJP party
Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, 'राजीव कुमार हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते.आज त्यांची बायको शाळेत गेली. त्यावेळी घरात कोणी नव्हतं. त्यावेळी राजीव कुमार यांनी स्वत:चा गळा दाबून आत्महत्या केली.

मृत राजीव कुमार यांचा मोठा भाऊ देखील भाजपच्या वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. हाजीपूरचे आमदार अवधेश सिंह यांनी घटनास्थळी पोहोचून राजीव कुमार यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.

BJP party
भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

पोलिसांनी मृत राजीव कुमार यांचा मुलगा आणि नातेवाईकांचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. तर राजीव कुमार यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी हाजीपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. राजीव कुमार यांच्या मृत्यूची वार्ता कळताच त्यांचे समर्थक त्यांच्या निवासस्थानी जमा होत आहेत. त्यांच्या निवासस्थानी समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com