समलिंगी मित्राला भेटायला मुंबईचा व्यापारी आग्र्याला पोहोचला, आधी कारमध्ये भयंकर घडलं, नंतर शेतात नेऊन मित्रांच्या मदतीने...

Mumbai Businessman Gay Dating App Agra Case: मुंबईतील 66 वर्षीय व्यावसायिक आग्र्याला समलैंगिक मित्राला भेटायला गेला आणि प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. पोलिस तपासात अपहरणाचा दावा खोटा ठरला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
CCTV footage shows the Mumbai businessman leaving the hotel and traveling to Hathras voluntarily.
CCTV footage shows the Mumbai businessman leaving the hotel and traveling to Hathras voluntarily.AI
Published On

मुंबई येथील एका 66 वर्षीय व्यावसायिक समलैंगिक संबद्ध ठेवण्यासाठी आग्र्याला गेला आणि त्यानंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. या व्यावसायिकाने समलैंगिक डेटिंग अपद्वारे काही पुरुषासोबत मैत्री केली होती. ही मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्यांनी एकमेकांना भेटायचे ठरवले. या व्यवसायिकाला भेटायला त्याने आग्र्याला बोलावले आणि हा त्याठिकाणी गेला.

CCTV footage shows the Mumbai businessman leaving the hotel and traveling to Hathras voluntarily.
Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यावसायिक हा 66 वर्षांचा आहे. महाराष्ट्रात कपड्यांचा व्यवसाय आहे. त्या व्यक्तीने गो-डेटिंग अपला वापरायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून त्याने काही पुरुषांसोबत भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांचे आग्र्यामध्ये भेटण्याचे ठरले. समलैंगिक संबंधांच्या नादात व्यावसायिक आग्र्यात पोहोचला. त्यानंतर शहरातील दरेसी परिसरातील हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आली. तो व्यावसायिक त्या पुरुषांसोबत बाहेर फिरण्यासाठी गेला आणि येथेच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

CCTV footage shows the Mumbai businessman leaving the hotel and traveling to Hathras voluntarily.
Crime: महिला पोलिसावर ७ वर्षे गँगरेप, ड्युटी असल्याचे सांगून हॉटेलवर न्यायचे अन् ड्रग्ज द्यायचे; वरिष्ठ अधिकाऱ्यासह सहकाऱ्यांवर आरोप

सीसीटीव्हीमध्ये व्यावसायिक कोणत्याही दबावाखाली न येता स्वतःहून हॉटेलमधून बाहेर पडताना आणि कारमध्ये बसून आग्राहून हाथरसला निघताना दिसत आहे. मात्र, हाथरसला पोहोचताच आर्थिक कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि वाद इतका टोकाला पोहोचला की त्या व्यावसायिकाकडून 1.20 लाख रुपये बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. तसेच त्या वृद्धाची अंगठी आणि मोबाइल फोनसुद्धा घेतला गेला. बदनामी, भीती आणि हे प्रकरण त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची शक्यतामुळे पीडित वृद्धाने चुकीचा निर्णय घेतला आणि तो थेट आग्र्यात आला आणि रात्री उशिरा एत्माद्दोला पोलिस ठाण्यात पोहोचला.

CCTV footage shows the Mumbai businessman leaving the hotel and traveling to Hathras voluntarily.
Crime News : तुझी शेवटची इच्छा काय? सिगारेट अन् दारू पाजली, नंतर धारदार शस्त्राने वार करत मित्राला संपवलं; हत्याकांडाने पुणे हादरले

पोलिसांना पीडित वृद्धाने जे काही सांगितले त्यामुळे पोलिसांच्या देखील भुवया उंचावल्या. काही अज्ञात लोकांनी त्याचे अपहरण केले आणि त्याच्याकडून पैसे मिळाल्यानंतर त्याला सोडून दिल्याचा आरोप त्या वृद्धाने केला. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोलिसांनी पथके तयार केली आणि झटपट चक्रे फिरली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि बँकेचे व्यवहार बघून हे स्पष्ट झाले की कोणतेही अपहरण किंवा पीडित व्यक्तीवर जबरदस्ती करण्यात आली नव्हती. ज्या लोकांसोबत फिरायला गेला होता त्यांच्याच विरोधात तो तक्रार दाखल करायला गेला होता.

मात्र पोलिसांनी चौकशी केली असता त्याने रचलेला कट त्याच्याच भोवती आला. त्या व्यावसायिकाने मोबाईल अपद्वारे काही पुरुषासोबत मैत्री केली होती आणि त्या मैत्रीचे रूपांतर समलैंगिक संबंधात झाले. हे अपहरण नसून समलैंगिक संबंध आणि भीतीने रचलेले एक षड्यंत्र होते. पोलिसांनी लगेचच कारवाई करत या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यावसायिकासह पाच लोकांच्या मुसक्या आवळल्या. तसेच ज्या बँक खात्यात पैसे टाकले होते ते देखील बंद करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com