Ranapati Shivray: दिग्पाल लांजेकरांच्या 'श्री शिवराज अष्टक'मधील सहावे पुष्प भेटीला; 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा टिझर प्रदर्शित

Ranapati Shivray: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा स्वारीवरील थरारक अध्यायावर आधारित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दिग्पाल लांजेकरांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील सहावे पुष्प प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ranapati Shivray
Ranapati ShivraySaam tv
Published On

Ranapati Shivray: छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, बुद्धिचातुर्य आणि मुत्सद्देगिरी यांचा अद्वितीय संगम दाखवणारा भव्य चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या महत्त्वाकांक्षी ‘श्री शिवराज अष्टक’ या संकल्पनेतील हे सहावे चित्रपटरूपी पुष्प असून, नुकताच या चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शिवचरित्रातील एका थरारक अध्यायाची झलक यात पाहायला मिळते.

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य उभारत असताना केवळ शौर्यावरच नव्हे, तर तीव्र बुद्धिमत्ता आणि मुत्सद्देगिरीवरही भर देत होते. महाराज गनिमी काव्याचे जनक मानले जातात. शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर आघात करणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि प्रसंगावधान राखून आखलेली रणनीती हे महाराजांचे वैशिष्ट्य होते. औरंगजेबाचे मुघल साम्राज्य त्या काळातील सर्वात बलाढ्य मानले जात होते. मात्र, अशा प्रबळ सत्तेलाही शिवाजी महाराजांनी हादरवून सोडले.

Ranapati Shivray
Dhurandhar: 'म्हणूनच धुरंधरसाठी रणवीर आणि सारामध्ये २० वर्षांचे अंतर...'; चित्रपटाच्या एज कंट्रोवर्सी दिग्दर्शक स्पष्ट बोलला

आग्र्याला जाण्याचा निर्णय घेणे आणि भर दरबारात मुघल साम्राज्याला निडरपणे आव्हान देणे, हा स्वराज्य उभारणीतील अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी अध्याय आहे. रक्ताचा एक थेंबही न सांडता शत्रूला नामोहरम करण्याची महाराजांची कूटनीती या घटनेत ठळकपणे दिसून येते. हाच थरारक इतिहास ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटातून भव्य स्वरूपात मांडण्यात येणार असून, हा चित्रपट १९ फेब्रुवारी, शिवजयंतीदिनी प्रदर्शित होणार आहे.

Ranapati Shivray
Pappyachya Pinkichi Love Story: गुन्हा आणि प्रेमाची दमदार कहाणी; 'पप्याच्या पिंकीची लव्हस्टोरी'चे पहिले पोस्टर प्रदर्शित

टिझरमध्ये औरंगजेबाच्या दरबारातील तणावपूर्ण प्रसंग, पोलादी पहाऱ्यातून महाराजांनी घेतलेली जोखीम आणि त्यांची निर्भय वृत्ती प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, विपुल अग्रवाल, जेनील परमार आणि मुरलीधर छतवानी हे चित्रपटाचे निर्माते असून, सहनिर्माते म्हणून रवींद्र औटी, तान्शा बत्रा आणि आलोक शर्मा यांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि धैर्याची प्रेरणा देणारा हा सुवर्णअध्याय रुपेरी पडद्यावर साकारताना दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे जगभर वितरण (वर्ल्ड वाईड रिलीज) करणार असून, इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक भव्य पर्वणी ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com