Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबली, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल; पाहा VIDEO

Mumbai Local Train Latest News : मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
Mumbai Local Train Latest News
Mumbai Local Train Latest NewsSaam TV
Published On

गेल्या ४८ तासांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंधेरी तसेच नवीन मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा मोठा फटका रेल्वेला बसला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.

Mumbai Local Train Latest News
Pune Rain Alert : पुण्यात रात्रभर अतिमुसळधार पाऊस, धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; ताजी आकडेवारी समोर

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक (Mumbai Local Train) आज गुरुवारी पहाटेपासून १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. परिणामी रेल्वेस्थानकावर सकाळपासून प्रवाशांची गर्दी होत आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील गाड्या ५ ते १० मिनिटं उशिराने सुरु आहे. तर हार्बर मार्गावरील लोकलसेवा ५ मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे.

तांत्रिक अडचणी आणि पावसामुळे वाहतुकीला विलंब होत असून प्रवाशांनी संयम बाळगावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान, मुंबईसह पुण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा (Mumbai Heavy Rain) फटका लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेनला देखील बसला आहे. मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस आज उशिराने धावत आहे.

गुरुवारी सकाळी ७ वाजेपर्यंत डेक्कन एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात उभी होती. त्यामुळे मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला होता. अनेक प्रवासी ट्रेन सुटण्याची वाट पाहत रेल्वेस्थानकावरच ताटकळून पडले होते.

मुसळधार पावसामुळे अंधेरी सब-वे पाण्याखाली

मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, मालाड, बोरिवली या भागात पावसाचं पाणी साचल आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी समवेत दोन फुटापर्यंत पाणी भरले आहे. त्यामुळे पोलिसांकडून अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसह ठाणे रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलाय.

Mumbai Local Train Latest News
Heavy Rainfall Alert : महाराष्ट्रात आज दिवसभर पाऊस, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर; IMD कडून सतर्कतेच्या सूचना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com