Shruti Vilas Kadam
प्रत्येकाचा केसांचा प्रकार वेगळा असतो. कोरडे, ऑइली किंवा डॅमेज केस ओळखूनच योग्य हेअर स्पा निवडा, अन्यथा अपेक्षित परिणाम मिळत नाही.
जास्त केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स केसांना नुकसान पोहोचवू शकतात. शक्यतो नैसर्गिक किंवा हर्बल हेअर स्पा निवडा.
वारंवार हेअर स्पा केल्याने केस कोरडे किंवा कमजोर होऊ शकतात. साधारण महिन्यातून एकदाच हेअर स्पा करणे योग्य असते.
हेअर स्पा केल्यानंतर लगेच केस धुणे, स्ट्रेटनर किंवा ड्रायर वापरणे टाळा. यामुळे स्पाचा परिणाम कमी होतो.
हेअर स्पानंतर योग्य शॅम्पू, कंडिशनर आणि तेलाचा वापर न केल्यास केस लवकर परत डॅमेज होतात.
हेअर स्पा हा केसांच्या निगेसाठी एक उपचार आहे, कायमस्वरूपी उपाय नाही. नियमित केसांची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे.
पहिल्यांदा हेअर स्पा करताना सलूनमधील हेअर एक्सपर्टचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. स्वतःहून स्पा निवडणे ही मोठी चूक ठरू शकते.