Mumbai Best Bus Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Mumbai Best Bus Accident: मुंबईमध्ये बेस्ट बसच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. बसच्या चाकाखाली चिरडल्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिने प्राण सोडले.

Priya More
  • वरळीमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात

  • मुंबईमध्ये बेस्ट बसच्या चाकाखाली चिरडून महिलेचा मृत्यू

  • वरळी अपघातात धारावीतील ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू

  • टॅक्सीतून उतरताना महिलेला बेस्ट बसची धडक

मुंबईमध्ये धावत्या बेस्ट बसच्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. वरळीमध्ये ही अपघाताची घटना घडली. मुंबई सेंट्रलकडे जाणाऱ्या बेस्ट बसने महिलेला धडक दिली. बसच्या मागच्या चाकाखाली चिरडून या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झाल्याने वरळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास मेला जंक्शन साऊथ बाउंड सिग्नलवर ही भीषण अपघाताची घटना घडली. मुंबई सेंट्रल आगाराच्या बेस्ट बसने महिलेला धडक दिली. त्यामुळे महिला रस्त्यावर पडली. याचवेळी बसच्या मागच्या चाकाखाली चिरडून या महिलेचा मृत्यू झाला. वनमाला राम साबळे (५९ वर्षे) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव होते. त्या धारावी येथे राहत होत्या.

बसच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेला बस कंडक्टरने तात्काळ नजीकच्या नायर रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून महिलेला मृत घोषीत केले. या अपघातानंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

घडलं असं की, बस सिग्नलवर थांबली होती. त्याचवेळी बसच्या बाजूला एक टॅक्सी उभी होती. या टॅक्सीतून महिला प्रवासी वनमाला साबळे खाली उतरत होत्या. सिग्नल सुटल्यामुळे बस चालकाने बस सुरू केली. चालकाने बस पुढे नेली असताना टॅक्सीतून उतरणाऱ्या वनमाला यांना धक्का लागला आणि त्या खाली पडून बसच्या चाकाखाली आल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जास्त रस्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT