Mumbai : मुंबईत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा AI
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Mumbai Malad Tragedy News : मुंबईतील मालाड पूर्व परिसरात पाण्याने भरलेल्या बांधकामाच्या खड्ड्यात पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बांधकामस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Alisha Khedekar

  • मालाडमध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू

  • चेंडू काढताना घडली दुर्दैवी घटना

  • बांधकामस्थळांवरील सुरक्षा प्रश्न पुन्हा चर्चेत

  • पोलिसांकडून तपास सुरू, निष्काळजीपणाचा संशय

संजय गडदे, मुंबई

Mumbai Malad Aambewadi Patel Chawl Divyansh Dies मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे.मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात बांधकामासाठी खोदलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका ८ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच या घटनेने पुन्हा एकदा मुंबईतील बांधकाम स्थळांवर सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांश राजेश मौर्य (वय ८) असे मृत मुलाचे नाव आहे. दिव्यांश हा चगन पटेल चाळ, आंबेवाडी येथे त्याच्या घराबाहेर खेळत असताना त्याचा चेंडू बाजूला सुरु असलेल्या बांधकामाच्या खड्ड्यात गेला. हा खड्डा पाण्याने भरलेला असल्याने चेंडू काढण्याच्या प्रयत्नात तो पाण्याने खोल खड्ड्यात पडला.

या घटनेबाबत स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कुरार व्हिलेज पोलीस घटनास्थळी पोहोचले. खूप प्रयत्न करून त्यांनी मुलाला बाहेर काढून तातडीने कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

हा खड्डा मौली कन्स्ट्रक्शन कंपनीने खोदला असल्याची माहिती समोर आली असून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात निष्काळजीपणा झाला का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Injured: लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान प्रसिद्ध गायिकेवर हल्ला; चेहऱ्यावर गंभीर दुखापत

गर्लफ्रेंड बेस्ट फ्रेंडसोबत निघाली, उद्योगपतीनं कारच्या बोनेटवर उडी मारली; पुढच्याच क्षणी भंयकर घडलं अन् जागेवरच मृत्यू

Varanasi : आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबार! प्रवाशाची तपासणी करताना पिस्तुलातून गोळी सुटली; मोठा अनर्थ टळला

Pune News: पिंपळगाव जोगा धरणात पर्यटकांची स्टंटबाजी, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Nag Panchami 2026: नागपंचमीला दारात काढण्यासाठी 5 सोप्या आणि सुंदर डिझाईन्स, जी पाहाल ती तुम्हाला आवडेल

SCROLL FOR NEXT