Mumbai News Mumbai News
मुंबई/पुणे

Shocking : संतापजनक ! पैशांसाठी आई मला शेजाऱ्याकडं पाठवायची; दहावीतील विद्यार्थिनीचा शिक्षिकेकडे धक्कादायक खुलासा

Mumbai Ghatkopar Crime News : मुंबईतील घाटकोपर परिसरात अल्पवयीन मुलीवर पैशासाठी आई आणि शेजाऱ्याने केलेल्या अमानुष अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षिकेच्या मदतीने हा गुन्हा उघड झाला असून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • अल्पवयीन मुलीवर घरातच अमानुष अत्याचार

  • पैशासाठी आईचं निर्दयी कृत्य

  • शिक्षिकेमुळे उघड झाला भयावह प्रकार

  • पोलिसांचा तपास सुरु

  • आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबईतील घाटकोपर परिसरातून एका आईचं निर्दयी कृत्य समोर आलं आहे. एका महिलेने तिच्या मुलीला पैशांसाठी शेजारील व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पडले. याप्रकरणी संबंधित पीडितेने आपल्या वर्गशिक्षिकेला घडलेली घटना सांगितल्याने हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी पोक्सो कायद्याच्या कलमाअंतर्गत मुलीच्या आई आणि शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपर परिसरातील नामांकित शाळेत श्वेता (बदलेलं नावं ) इयत्ता १० वीच्या वर्गात शिकते. या मुलीची आई मालती (बदलेलं नाव) आणि श्वेता या दोघीचं एका घरात राहतात. मालतीला पैशांची चणचण असल्याने तिने श्वेताला शेजारच्या व्यक्तीच्या तावडीत दिल. पैसे मिळावे म्हणून मालती श्वेताला दररोज शेजारील व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पडायची.

ती अनेकदा नकार द्यायची, त्यांच्याशी भांडायची आणि वाद घालायची, पण प्रत्येक वेळी तिला धमक्या देऊन गप्प बसवले जायचे. परिस्थिती इतकी बिकट झाली की एके दिवशी ती घरातून तिच्या मैत्रिणीच्या घरी पळून गेली. तिचे त्रास संपतील या आशेने ती तीन दिवस तिथे लपून राहिली. पण जेव्हा ती जबरदस्तीने घरी परतली तेव्हा पुन्हा तिच्यावर अत्याचार झाले. तिची आई आणि शेजारी दोघेही तिला पुन्हा पैशासाठी इतरांकडे पाठवू लागले.

या प्रकाराला कंटाळून श्वेताचा भर वर्गात अश्रूंचा बांध फुटला. ती ढसाढसा रडू लागली. या दरम्यान वर्गात उपस्थित असलेल्या शिक्षिकेने तिला का रडत आहेस असं विचारल्यावर सुरुवातीला श्वेताने काहीच सांगितलं नाही. परंतु शिक्षिकेने आणखी विश्वासात घेत मुलीला आपुलकीने विचारलं असता श्वेताने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल शिक्षकांजवळ सांगितलं.

श्वेताने शिक्षकांना सांगितल्याप्रमाणे शाळेतील शिक्षकांनी तिला ताबडतोब सुरक्षित ठिकाणी नेले आणि शाळा प्रशासनाला कळवले. शाळेने ताबडतोब पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलीच्या आई आणि शेजाऱ्याविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलमांसह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT