Raju Patil On Maratha Reservation Saam tv
मुंबई/पुणे

Raju Patil On Maratha Reservation: सरकारने मराठा समाजाला सत्य परिस्थिती सांगावी; मनसे आमदार राजू पाटील यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य

Raju Patil On Maratha Reservation: राज्य सरकारने मराठा समाजाला सत्य परिस्थिती सांगावी, असं सूचक वक्तव्य राजू पाटील यांनी केलं.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Raju Patil News:

मराठा आरक्षण संदर्भात काल सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील मराठा आरक्षणाला समर्थन दिलं. या बैठकीबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा सरकारला लक्ष्य केलं. या बैठकीत सरकार स्पष्ट काय बोलायला तयार नव्हतं, सरकारकडून बरं बरं बोललं जात होतं, मात्र खरं खरं बोललं जात नव्हतं, असा खोचक टोला सरकारला लगावला. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाला सत्य परिस्थिती सांगावी, असं सूचक वक्तव्य राजू पाटील यांनी केलं. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाबाबत झालेल्या बैठकीबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी भाष्य केलं. 'सरकारच्या अंगाशी आल्याशिवाय ते सर्व पक्षीय बैठक बोलवत नाहीत. तर त्यांच्या अंगाशी आलं की त्यांना आमचे खांदे पाहिजे असतात. महाराष्ट्र हिताचा विचार करून सगळे एकत्र येतात. त्यांनी ही गोष्ट 40 दिवसांपूर्वी सांगायला पाहिजे होती. तांत्रिक बाबी लोकांना समजून सांगा. सरकार बसवणं ,उठवणं, पळवा-पळवी याच्यातच वेळ गेला. मराठा समाजाला सत्य परिस्थिती सांगावी, असे राजू पाटील म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'काही गोष्टी न्यायालयाकडून होणार आहेत, काही प्रशासकीय बाबी आहेत. मराठा आरक्षण दिल्यानंतर ते टिकले पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा चारही बाजूने विचार केला पाहीजे. सरकार आता सकारात्मक चाललंय , असे ते म्हणाले.

'आंदोलकांनी सरकारला वेळ दिला पाहिजे, आपल्या जीवाशी खेळ न करता समजूतदारपणाची भूमिका घेऊन त्यांनी पुढे चालले. तर मराठा आरक्षण मिळायला काही अडचण होणार नाही ,यासाठी वेळ जाईल हे सरकारने सांगायला पाहिजे, मराठा समाजाला विश्वासात घ्यायला पाहिजे, असे पाटील यांनी पुढे सांगितलं.

'इतके वर्ष गेले तर थोडं एक पाऊल मागे घेऊन समजूतदारपणा दाखवून संयम ठेवायला पाहिजे, असं आवाहनही मराठा समाजाला राजू पाटील यांनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जमीन व्यवहार प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमधील आंबेडकरवादी पक्ष संघटना आक्रमक

Why do Medu Vada have a hole: मेदू वड्याला मधोमध होल का पाडतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra Politics: कालचे वैरी आजचे मित्र? शिंदेसेना आणि ठाकरेंसेना एकत्र येणार? VIDEO

Solapur Tourism: खरंच माथेरान, महाबळेश्वर विसराल! सोलापूरपासून 123 km दूर असलेल्या 'या' हिल स्टेशनवर एकदा जाच

Mix Dal Dosa Recipe: घरीच बनवा मिक्स डाळींचा पौष्टिक डोसा; नाश्त्यासाठी हेल्दी अन् टेस्टी ऑप्शन

SCROLL FOR NEXT