Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय भानगडीत पडू नये; मराठा क्रांती ठोक मोर्चाची भूमिका, काळजीही केली व्यक्त

Maratha Aarkshan: 70 वर्षात कोणत्याच पक्षाने न्याय दिला नाही, पण भाजप सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.. असेही ते म्हणाले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam tv
Published On

रणजित माजगावकर, प्रतिनिधी

Maratha Reservation Protest:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबत सरकारला जेरीस आणल्याचे दिसत आहे. मराठा आंदोलनावरुन जरांगे पाटील सातत्याने सरकारवर निशाणा साधत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राजकीय नेत्यांवर ते कडाडून टीका करत आहेत. जरांगेंच्या या भूमिकेवर मराठा ठोक मोर्चाने विरोध दर्शवला असून जरांगेंनी राजकीय नेत्यांवर बोलू नये. असे मोठे विधान आबा पाटील यांनी केले आहे.

काय म्हणाले आबा पाटील?

मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय नेत्यांवरील टीकेला विरोध दर्शवत मराठा क्रांती ठोक मोर्चा चे समन्वयक आबा पाटील यांनी भाजपचे समर्थन केले आहे. "जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रश्नावर भूमिका मांडावी, परंतु त्यांनी राजकीय भानगडीत पडू नये, कोणती ही राजकीय भूमिका घेवू नये..." असा सल्ला त्यांनी दिला आहे.

तसेच "70 वर्षात कोणत्याच पक्षाने आम्हाला न्याय दिला नाही, पण भाजप सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. असे म्हणत येता दोन-तीन दिवसात हे आंदोलन संपले पाहिजे, मराठा समाज आता वाट पाहू शकत नाही. जो निर्णय घ्यायचा तो दोन-तीन दिवसात द्या.." असेही ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Mumbai News: आँsss काय सांगता! अजगर, घोरपडी, पाली, सरडे चोरून नेले; मुंबईतील प्रकारानं खळबळ

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नुसती बैठक झाली, आम्ही सकारात्मक आहे असं म्हणून चालणार नाही, सर्व मराठा समाजाचे आंदोलक एकत्र आहोत, असे म्हणत जरांगे पाटील यांच्या संदर्भात काही चुकीची भूमिका घडली तर सरकारला ते परवडणार नाही असा इशाराही आबा पाटील यांनी यावेळी दिला. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil
Israel-Hamas War: इस्राइल-हमास युद्धात भारतीय वंशाच्या २० वर्षीय सैनिकाचा मृत्यू; गाझामध्ये बलिदान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com