Ramdas Athawale News: मराठा आरक्षणाची मागणी सर्वात आधी मी केली होती; रामदास आठवलेंचा दावा

Ramdas Athawale On Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणासंदर्भात दोन दिवस अधिवेशन बोलवून चर्चा करावी.. असेही रामदास आठवले म्हणाले.
Ramdas Athawale On Maratha Reservation Protest:
Ramdas Athawale On Maratha Reservation Protest:Saamtv
Published On

गिरीश कांबळे, प्रतिनिधी

Maratha Reservation Protest:

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकरट मराठ्यांना कुणबी आरक्षण द्यावे.. अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. जरांगेंच्या या उपोषणाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून गावागावात मराठा समाज एकवटल्याचे चित्र आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाची मागणी सर्वप्रथम मी केली असल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

"राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असून जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वात पहिली मागणी मी आणि माझ्या पक्षाने केली होती.." असा दावा रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला आहे.

दोन दिवसाचे अधिवेशन बोलवावे...

"सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यायचे असं नाही ज्यांचं उत्पादन 8 लाख उत्पादन आहे त्यांना आरक्षण द्यावे अशी जरांगे (Manoj Jarange Patil) यांची मागणी आहे. आताची आंदोलने तीव्र झाली आहेत, पहिली आंदोलन अशी झालेली नव्हती. त्यामुळे सरकार आरक्षण देईल पण जरांगे पाटील यांचा जीव वाचला पाहिजे, अनेकांनी मागणी केली आहे की एक दिवसाचे अधिवेशन घ्यावे पण माझीही मागणी आहे की दोन दिवस अधिवेशन बोलवून चर्चा करावी.." असे रामदास आठवले म्हणाले.

Ramdas Athawale On Maratha Reservation Protest:
Manoj Jarange on Maratha Reservation: आता होऊ द्या, 'दूध का दूध अन् पानी का पानी'; मनोज जरांगे भडकले

जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा...

याबाबत पुढे बोलताना इतरांना अडचणीत न आणता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. ओबीसीत कोणाला टाकायचे याचा आमच्या मंत्रालयाला प्रस्ताव दिला तर आम्ही ते पुढे करू आणि आरक्षण देण्याचा प्रयत्न करु, मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपणदेखील आंदोलन करा.. असे रामदास आठवले म्हणाले. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ramdas Athawale On Maratha Reservation Protest:
Maratha Reservation : महाराष्ट्र आज जळतोय त्याला एकमेव उद्धव ठाकरे जबाबदार, भाजपची सडकून टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com