''ज्या गावाला लागली होती बाबासाहेबांची पावले, त्या शहराचे नाव आहे येवले', असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. नाशिकच्या येवला येथे पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.
आठवले म्हणाले की, ''माझ्या सहित छगन भुजबळ व लाखो आंबेडकर अनुयायी मुक्ती भुमीकडे आज धावले.'' आठवले यांनी कवितेतून येथील मुक्तिभूमीचे वर्णन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या मुक्तीभूमी येथे अजून विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव देत मागणी करणार असल्याचे आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
ते म्हणाले, २०३५ मध्ये धर्मांतर घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्ताने लाखोंचा जनसमुदाय इथे उसळणार असल्याने विकासासाठी २५० कोटी रुपयांची मागणी सरकारकडे करणार आहे. (Latest Marathi News)
'भाजपने संधी दिल्यास शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार'
रामदास आठवले म्हणाले की, ''लोकसभेच्या जागेची मागणी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) यांच्या बैठकीत करणार असून याअगोदर मी पंढरपूर येथून दोन वेळा, मुंबई येथून एक वेळ खासदार राहिलो आहे. मात्र शिर्डी येथे लोकसभा निवडणूक लढवली पण अपयश आले.''
आता शिर्डी येथे पुन्हा संधी मिळाली तर, मी निवडणूक लढण्यासाठी नक्की उच्छुक आहे. 2026 पर्यंत मी राज्यसभेवर खासदार आहे. पण भाजपने संधी दिली तर मी शिर्डी येथून इच्छुक असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगिल्याने.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.