Rahul Narvekar: 'आदेशाचं पालन केलं जाईल, परंतु', सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर नार्वेकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया

MLA Disqualification Case: 'आदेशाचं पालन केलं जाईल, परंतु', सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर नार्वेकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया
Rahul Narvekar On Supreme Court
Rahul Narvekar On Supreme CourtSaam Tv
Published On

Rahul Narvekar On Supreme Court:

आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. यावरच आता नार्वेकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नार्वेकर म्हणाले आहेत की, कोर्टाचा अनादर केला जाणार नाही. विधिमंडळाच सार्वभौमत्व राखन माझं कर्तव्य आहे. विधिमंडळाच न्याय आणि संविधानिक तरतुदी याबाबत कुठेही तडजोड केली जाणार नाही.

Rahul Narvekar On Supreme Court
Mega Block News: प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, असं असेल नवीन वेळापत्रक

ते म्हणाले, ''निवडणूक चिन्ह समोर घेऊन मी निर्णय देत नाही. मी निर्णय लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जर मी नियम न पाळता निर्णय घेतला तर ती चूक होईल. सर्वोच्च न्यायालय ही जबाबदार संस्था आहे.'' (Latest Marathi News)

सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, निकाल लवकर द्या, नाहीतर तोपर्यंत निवडणूक होतील. असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटल्याची माहिती वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी अध्यक्षांना समजवा अशी सूचनाही महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिल्याची माहिती आहे.

Rahul Narvekar On Supreme Court
LIC Scheme: जबरदस्त आहे LIC ची ही योजना, 45 रुपयांची बचत करून 25 लाख कमावण्याची संधी

सुपरिणाम कोर्टाने नार्वेकर यांच्यावर संताप व्यक्त करत म्हटलं आहे की, ''आम्ही १४ जुलैला नोटीस काढली, त्यानंतर २३ सप्टेंबरमध्ये आदेश काढला. पण विधानसभा अध्यक्षांनी आतापर्यंत कोणतेच निर्णय घेतले नाहीत.'' सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले की, निवडणुकांआधी या प्रकरणाचा निकाल लागला पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com