पैशाच्या वादातून लोक कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. पैशासाठी लोक एकमेकांचा जीव घ्यायलाही धजावत नाहीत. कर्नाटकमधून अशीच एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये एका युवकाची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आली. भरचौकात घडलेल्या या भयंकर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर (Social Media) असंख्य प्रकारचे भयंकर व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या कर्नाटकमधील एका धक्कादायक व्हिडिओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. बेंगळुरूमधील (Bengluru) पुलकेशी नगरजवळ एका तरुणाला स्कॉर्पिओ गाडीखाली चिरडून हत्या केल्याची घटना घडली. ही भयंकर घटना एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
असगर असे या गाडीखाली चिरडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर अमरीन असे या गाडी चालकाचे नाव आहे. भरचौकात वर्दळीच्या ठिकाणी पळवून पळवून या तरुणाच्या अंगावर गाडी घालण्यात आली. या क्रुर कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून अमरीनला पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना पैशाच्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत तरुण असगर हा जुन्या गाड्या विकण्याचे काम करत होता. त्याच्याकडून अमरीनने स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली होती. मात्र या गाडीचे चार लाख रुपये देणे बाकी होते. असगरने अमरीनकडे याच पैशांची मागणी केल्याने दोघांमध्ये वाद झाला.
हा वाद वाढत जाऊन दोघांमध्ये मारामारीही झाली होती. या मारहाणीनंतर अमरीनने त्याच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यास सांगितले होते. याबाबत चर्चा करण्यासाठी त्याने असगरला पुलकेशी नगरजवळ बोलावून घेतले. याठिकाणी पळवून पळवून त्याच्या अंगावर गाडी घालत चिरडून हत्या करण्यात आली.
दरम्यान, सुरूवातीला हा संपूर्ण अपघात असल्याचा बनाव गाडीचालक तरुणाने केला होता. मात्र व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि अमरीनला अटक करण्यात आली. या प्रकरणात त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनाही अटक करण्यात आली आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला असून अशा क्रुरकृत्य करण्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.