High Court Decision: फक्त लग्नाचं वचन दिलं म्हणून समजूतदार महिला पुरुषासोबत फिरू शकत नाही; हायकोर्टाचं मत

High Court Decision: फक्त लग्नाचं आश्वासन दिलं म्हणून कोणतीही समजूतदार महिला दोन वर्षे एखाद्या पुरुषासोबत फिरू शकत नाही, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली आहे.
Andhra Pradesh High Court Decision on promise of marriage case
Andhra Pradesh High Court Decision on promise of marriage case Saam TV
Published On

Andhra Pradesh High Court Decision

फक्त लग्नाचं आश्वासन दिलं म्हणून कोणतीही समजूतदार महिला दोन वर्षे एखाद्या पुरुषासोबत फिरू शकत नाही, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली आहे. इतकंच नाही, तर महिलेने आरोपीविरोधात दाखल केलेला बलात्काराचा खटला देखील हायकोर्टाने रद्द केला. आंध्र प्रदेश हायकोर्टाचे न्यायमूर्ती के श्रीनिवास रेड्डी यांनी हा निर्वाळा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Andhra Pradesh High Court Decision on promise of marriage case
BJP MLA's Wife Missing : भाजप आमदारांची पत्नी २४ तासांपासून बेपत्ता; पोलिसांनी शेवटचं लोकेशनही शोधलं, पण...

काय आहे प्रकरण?

लग्नाच्या भूलथापा देत एका व्यक्तीने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप उच्चशिक्षित महिलेने केला होता. आरोपीने फसवणूक करून दोन वर्षे लैंगिक शोषण केलं. त्यानंतर लग्नास नकार दिला, असे महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

याविरोधात आरोपीने आंध्र प्रदेश हायकोर्टात (High Court) धाव घेत याचिका दाखल केली. यावर बुधवारी सुनावणी घेण्यात आली. फक्त लग्नाचं आश्वासन दिलं म्हणून कोणतीही समजूतदार महिला दोन वर्षे एखाद्या पुरुषासोबत फिरू शकत नाही, अशी टिप्पणी हायकोर्टाने केली.

Andhra Pradesh High Court Decision on promise of marriage case
Arvind Kejriwal News : अरविंद केजरीवाल यांना उद्या अटक होणार? 'आप'चं पुढचं प्लानिंग कसं असेल?

तक्रारदार महिला उच्चशिक्षित असल्याने तिला चांगल्या-वाईट गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे ती सहजासहजी कोणत्याही व्यक्तीच्या फसवणुकीला बळी पडू शकत नाही. जात वेगळी असल्याचं माहिती असूनही महिलेने आरोपीला दोन वर्षे डेट केलं. दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. हे कुणाच्या एकाच्या सहमतीने होऊ शकत नाही, असंही हायकोर्टाने म्हटलं.

जेव्हा महिला आणि पुरुषाचे एकमेकांवर प्रेम असते. तेव्हा ते सहमतीने शारीरिक संबंध ठेवतात. केवळ लग्नाचं आश्वासन दिलं म्हणून महिला कोणत्याही पुरुषाला दोन वर्षे डेट करू शकत नाही. तसंच त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नाही. अशा गोष्टी दोघांच्या सहमतीनेच घडतात, असंही कोर्टाने निकालात नमूद केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com