Uttar Pradesh BJP MLA Sitaram Verma Wife Missing : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता झाली आहे. या घटनेला २४ तास उलटून गेले आहेत.
सुलतानपूरच्या लंभुआ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सीताराम वर्मा यांच्या पत्नी मंगळवारी सकाळी सहा वाजता कामानिमित्त घरातून बाहेर पडल्या होत्या. तेथून त्या परतल्याच नाहीत. या प्रकरणी त्यांचा मुलगा पंकज यानं गाजीपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आमदार वर्मा यांच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी लखनऊ पोलिसांनी (Uttar Pradesh Police) सहापेक्षा जास्त पथके नेमली आहेत. तर सर्व्हिलान्स टीमसह सायबर सेलही सक्रिय झाला आहे. सीताराम वर्मा यांचा मुलगा पंकज वर्माने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आम्ही गाजीपूर सेक्टर ८ मध्ये राहतो. माझी आई पुष्पा वर्मा (वय ६५) मंगळवार सकाळी सहा वाजता काही कामानिमित्त घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या परतल्या नाहीत. त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळाली नाही, असं पंकजने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (Latest News)
अनेक संभाव्य ठिकाणी त्यांचा शोध घेतला, पण त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे पोलिसांत तक्रार (Police Complaint) दाखल केली. त्या घरातून निघून गेल्या त्यावेळी वडील सुलतानपुरात होते. माहिती मिळाल्यानंतर ते लखनऊला पोहोचले. आमदार सीताराम वर्मा (Sitaram Verma) यांनी डीजीपींची भेट घेतली. पत्नी पुष्पा यांचा शोध घ्यावा, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
गाजीपूर आणि इंदिरानगर पोलीस अॅक्टिव्ह झाले असून, पुष्पा वर्मा यांच्या शोधासाठी पथके नियुक्त केली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पुष्पा वर्मा यांचे शेवटचे लोकेशन हे सकाळी ९ वाजता इंदिरानगरच्या अरविंदो पार्क चौकीजवळ होतं. आतापर्यंत २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण तपासले आहे. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्स पथकही नेमले असून, त्यांच्या मदतीने शोध घेतला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.