सोशल मीडिया हे असे एक माध्यम आहे जिथे कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतो. काही व्हिडीओ असे असतात जे आपल्याला माणसातल्या माणुसकीचे उत्तम दर्शन घडवतात. अशातच प्रत्येकाच्या मनाला भिडणारा अशाच एका बाईकस्वाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा दिसत आहे. मात्र यात एका बाईकस्वाराने भर वाहतूक कोडींतून एका रुग्णवाहिकेला रुग्णालयात जाण्यासाठी वाट करुन दिली आहे. रुग्णवाहिकेला लवकरात लवकर पुढे जाता यावं म्हणून तो बाईकस्वार मार्ग करून देताना दिसून येत आहे.
@n_i_l_k_h_o_d_k_a_या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हायरल झालेला व्हिडीओ मुंबईतील आहे अस समजत आहे. पण या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील रुग्णवाहिका ही ३ दिवसांच्या लहान बाळाला हॉस्पिटला घेऊन जात आहे असं कॅप्शनमध्ये लिहण्यात आलं आहे. तसेच त्यांनी व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की,'रुग्ण वाहिकेला मार्ग करून देण्यासाठी मदत...ही माणुसकी धर्माची माणसं आहेत हा धर्मच आपल्याला पुढे न्यायचा आहे !मित्रांनी... खूप भारी काम केलं'
सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील बाईकस्वाराचे नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केले आहे. व्हिडीओला हजाराच्या घरात व्हूज मिळाले आहेत .तसच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडीओ पाहून कायम असे वाटते ...माणसाची पदवी ही फक्त कागदाचा तुकडा आहे, जर आपल्या वागण्यात माणुसकीचे प्रतिबिंब दिसत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.