मराठा आरक्षणावरुन राज्यात परिस्थिती चिघळली आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. राज्यात आज निर्माण झालेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
खरंतर मराठा समाजावर जो अन्याय झालाय त्यात कुणी दोषी आहे तर ते उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे हे मंत्रालयात अडीच वर्ष आले असते, योग्य वकील लावला असता तर ही परिस्थिती उद्धभवली नसती. मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे हे जर सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिलं असत तर हे दिवस नसते आले, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महाराष्ट्राची उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे. कारण महाराष्ट्र जो जळतो आहे त्याला एक आणि एकमेव व्यक्ती दोषी आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे. देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. महाराष्ट्राला माहित आहे की देवेंद्र फडणवीस हा एकमेव नेता असेल ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ओबीसींचं आरक्षण कमी न करता दिलं होतं. यामुळे या भूमिकेतूनच पुढे गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्व लोक मराठा आरक्षणच्या पाठीशी आहोत. जरांगे यांच्या आंदोलनासोबत आम्ही उभे आहोत. पण या महाराष्ट्रात जी जाळपोळ सुरु आहे इतर समाजाला त्रास होऊ नये, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पू्र्ण ओबीसी समाज हा मराठा आरक्षण मिळावं याकरिता पूर्ण पाठीशी आहे. यामुळे कुणाचे घर फोडून घर पेटवून कुणाला त्रास देऊन महाराष्ट्रात असंतोष केला जाऊ नये, असंही बावनकुळे यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी होत आहे. मात्र विशेष अधिवेशन घ्यायचं की नाही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. त्यामुळे ते जे भूमिका घेतील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याला भाजप सहमत आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.