Manoj Jarange News : सरकारने चिल्लर चाळे बंद करावे, आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले

Manoj Jarange Andolan : आमच्याकडून उद्रेक होणार नाही. कायदासुव्यवस्था बिघडणार नाही याची आम्ही काळीज घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
Manoj Jarange Patil Latest News
Manoj Jarange Patil Latest NewsSaam Tv
Published On

Manoj Jarange Patil News :

मराठा आरक्षणावरुन राज्यभरात चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मागील ८ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार आरक्षण द्यायचं नाही म्हणून चिल्लर चाळे सुरु केले आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

सरकारला जाणून बुजून आरक्षण द्यायचं नाही. वातावरण खराब करण्याची इच्छा सरकारची असल्याचं दिसून येत आहे. त्यात नेट बंद करुन चिल्लर चाळे सरकार करत आहे. मराठा समाजाचं आंदोलन जाणूनबुजून मोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आता ते शक्य होणार नाही, असं मनोज जरांगे म्हटलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil Latest News
Maratha Aarakshan : मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडली, आमदार निवासाबाहेरील घटनेने पोलिसांची धावपळ

मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही. नेट बंद केलं तरी आम्हाला फरक पडणार नाही. सरकार मला आंदोलनावरुन उठवू शकत नाही आणि मी देखील उठणार नाही. आमच्याकडून उद्रेक होणार नाही. कायदासुव्यवस्था बिघडणार नाही याची आम्ही काळीज घेत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यास किती वेळ लागेल हे स्पष्ट करावं. तुम्ही आरक्षण का देत नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मराठा तरुण शांत आहेत. आमच्या आंदोलनातील लोकांना उचलून नेतात. मुखमंत्र्यांनी नेट बंद केले, उपमुख्यमंत्री दगाफटका करू शकतात. उपमुख्यमंत्री यांनी 307 लावून स्वप्न पूर्ण केले, अशी टीका मनोज जरांगे यांनी म्हटलं.

Manoj Jarange Patil Latest News
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना पोलीस उचलणार असल्याची अफवा; हजारो तरुणांची अंतरवाली सराटीत धाव, परिसरात शांतता

सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वपक्षीय बैठकी बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील बडे नेते सहभागी होणार आहेत. न्यायमूर्ती शिंदेंचा अहवाल या बैठकीत वाचून दाखवला जाणार आहे.

सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावर नेत्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. आरक्षणाबाबत आणखी काय उपाययोजना किंवा सूचना या जाणून घेतल्या जाणार आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था यावर देखील चर्चा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com