Shiv Sena MLA Sanjay Gaikwad warning to those opposing Maratha reservation
Shiv Sena MLA Sanjay Gaikwad warning to those opposing Maratha reservationSaam TV

Buldhana News: मराठा आरक्षणाच्या आड आल्यास नरडीचा घोट घेईन; फाडून खाईन, शिंदे गटाचा आमदार संतापला

Sanjay Gaikwad on Maratha Reservation: बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
Published on

Sanjay Gaikwad on Maratha Reservation

मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. सरकारने आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला आता आमदार तसेच खासदारांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना इशारा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad warning to those opposing Maratha reservation
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना पोलीस उचलणार असल्याची अफवा; हजारो तरुणांची अंतरवाली सराटीत धाव, परिसरात शांतता

मराठा आरक्षणाला कुणी विरोध केला, तर त्याच्या नरडीचा घोट घेईन आणि त्याला फाडून खाईन, अशी आक्रमक भूमिका आमदार संजय गायकवाड यांनी घेतली आहे. मोताळा येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे भूमिपूजन सोहळा मंगळवारी पार पडला. यावेळी बोलताना संजय गायकवाड यांनी हे विधान केलं आहे.

आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले की, मराठा समाजाला यापूर्वी आरक्षण मिळालं होतं. पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आरक्षणाला कुणी कडाडून विरोध केला हे सर्वांना माहीत आहे. मी ‘त्याचे’ नाव घेणार नाही. मात्र, यापुढे जर कुणी मराठा आरक्षणाला विरोध केला तर त्याचा जीव घेईल.

त्याला फाडून खाईन, त्याच्या नरडीचा घोट घेईन, असा धमकी वजा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. आरक्षण न मिळल्याने मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता आरक्षणाच्या आडवे येणाऱ्याची गय करणार नसल्याचंही संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

गील तीन दिवसांपासून जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची धग कायम आहे. जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यावर बोलताना सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार सक्षम आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं, तसंच शांततेत आंदोलन करावं, असं आवाहन देखील संजय गायकवाड यांनी केलं आहे.

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad warning to those opposing Maratha reservation
Pune News: मराठा आरक्षणासाठी नवले पुलावर जाळपोळ; पोलिसांकडून ४०० ते ५०० जणांविरोधात गुन्हे दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com