Maratha Reservation : आरक्षण न मिळाल्यास मराठा समाज 'काळी दिवाळी' साजरी करणार; बैठकीत काय ठरलं?

Sakal Maratha Samaj News : सकल मराठा समाजाची आज बैठक पार पडली, त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv news

Nashik News :

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही अशा पवित्र्यात मराठा समाज आहे. मात्र सरकारकडून सातत्याने टिकणारं आरक्षण मिळावं, यासाठी वेळ वाढवून मागितला जात आहे. अशात दिवाळीच्या आधी आरक्षण न मिळाल्या काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.

मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मराठा समाज काळी दिवाळी साजरी करणार आहे. सकल मराठा समाजाची आज बैठक पार पडली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास दिवाळी साजरी करणार नाही. मराठा आरक्षण न मिळाल्यास एकाही मराठा बांधवाच्या दारात दिवा, पणती पेटणार नाही, असं बैठकीत ठरलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठीच्या सर्वपक्षीय बैठकीत काय झालं? CM शिंदेंनी सर्व माहिती दिली, मनोज जरांगेंनाही आवाहन

सर्वपक्षीय बैठकीत काय झालं?

मराठा आरक्षणासाठी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन सरकारकडून करण्यात आलं होतं. सर्वच प्रमुख पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले असून आमदारांच्या घरांवरील हल्ले, दगडफेक यावर सर्वांनीच चिंता व्यक्त केली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह प्रमुख नेते उपस्थित होते. (Latest Marathi News)

Maratha Reservation
Sambhaji Bhide On Maratha Arakshan : मराठा आरक्षणावर संभाजी भिडे स्पष्टच बोलले; म्हणाले, लबाड नेत्यांमुळं रखडलं...

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या दुर्दैवी घटना होत आहेत, त्यावर सर्वच नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे मराठा समाजाचं शांततेनं सुरू असलेले आंदोलनाला गालबोट लागले. मराठा समाजानंही संयम बाळगण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करत आरक्षण देण्यासाठी जे जे करता येईल ते केलं जाईल. जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहनही सर्वपक्षीय नेत्यांनी केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com