राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलं मोठं भाष्य
मोदी सरकारने इराणला साथ दिली नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले
खामेनेईंच्या मृत्यूनंतर सरकारनं कोणतंही विधान केलं नाही - ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात इराण-इस्त्रायल युद्धावर मोठं भाष्य केलं. 'युद्धात मोदींनी इराणला साथ द्यायला हवी होती. खामेनेईंच्या मृत्यूनंतर भारताने सरकारनं कोणतंही विधान केलं नाही. इराणच्या मागे अडचणीच्या काळात उभे राहिलो नाही. याचा त्रास भविष्यात निश्चित होईल, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शक्यता व्यक्त केली
मनसे पक्षाला २० वर्ष पूर्ण झाले आहेत. पक्षाला २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मनसेने पु्न्हा एकदा संघटन बांधणीवर लक्ष दिले आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पुन्हा सत्ता मिळवणार असल्याचे भाष्य केलं. यावेळी राज ठाकरेंनी इराण-इस्त्रायल युद्धावरून मोदी सरकारला सल्ला दिला.
राज ठाकरे म्हणाले, पुढील तीन वर्षे निवडणुका नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांकडून पैसे खायला सगळेच मोकळे आहेत. आज देशातही आहेत. धाकधूक सुरू आहे. भीषण परिस्थिती आहे. गॅस मिळत नाही. नेहमी नॉर्मलला असणारी लोक गॅसवर आहेत. खरं तर काही गोष्टी आपल्याकडून, पंतप्रधानांकडून राहून गेल्या, जो इराण इतकी वर्षे साथ देत नव्हता त्या इराणवर हल्ले होत आहेत. आपण इराणला साथ द्यायला हवी होती'.
'भारतात येणारं सगळं तेल हे इराणमधून येतं. ते आपल्याला रुपयात देतात. देत आले. पण खामेनेई गेल्यानंतरही भारताच्या पंतप्रधानांनी कुठलंही निषेधाचं स्टेटमेंट काढलं नाही. सरकार हल्ल्याविषयी काही बोलले नाही. त्याच्या मागे आपण अडचणीच्या काळात उभे राहिलो नाही. याचा त्रास भविष्यात निश्चित होईल. सगळ्या बाजूने समजतच नाही. नेमके आपण कुठे, काय चाललो आहोत. या देशातील राज्ये, लोक, प्रगती कुठे होतेय, गेल्या जानेवारीत सभा झाली त्यावेळी अनेकांचे वाभाडे काढले, आपणही किती अडाणी आहोत हे सांगितले, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.