Manasvi Choudhary
आजकाल बीझी शेड्यूलमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल वाढणे आणि हृदयविकाराचा झटका या आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
या गंभीर समस्यांसाठी तुम्ही केवळ गोळ्या औषधं घेणे महत्वाचे नाही तर आहारात फळांचा समावेश करणे महत्वाचे आहे.
पेरूमध्ये सोडिअमचे प्रमाण कमी असते. यामुळे शरीरातील एनर्जी टिकून राहते. जाते. नियमित पेरू खाल्ल्याने रक्तवाहिन्यांचा ताण कमी होतो आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मोठी मदत होते.
पेरूमध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर असते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी किंवा ब्लॉकेज साचण्याचा धोका टळतो.
पेरूमध्ये असलेले पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स हृदयाचे स्नायू बळकट करतात. तसेच रक्ताभिसरण सुरळीत ठेवून हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी करतात.
फायबरयुक्त पेरू खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. तसेच कॅलरीजमध्ये कमी असल्यामुळे पेरू खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वाढलेले वजन आणि लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.