Manasvi Choudhary
किडनी हा शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे. शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण करण्याचे आणि टाकाऊ घटक बाहेर टाकण्याचे सर्वात महत्त्वाचे काम 'किडनी' करते.
किडनी निरोगी राहिली तरच संपूर्ण शरीर स्वस्थ राहू शकते. मात्र आजकाल कामासाठीची धावपळ आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल किडनीवर ताण येण्याचे प्रमाण वाढले आहे.
किडनीचे कार्य सुधारण्यासाठी आणि किडनी डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही आहारात फळांचा समावेश करणे महत्वाचे आहे.
युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन दूर करण्यासाठी क्रॅनबेरीचे सेवन फायदेशीर आहे. हे फळ युरिन ट्रॅक्टमध्ये बॅक्टेरिया जमा होऊ देत नाही.
सफरचंदामध्ये भरपूर फायबर असते, जे जळजळ कमी करते आणि किडनीवरील ताण हलका करून रक्तवाहिन्या निरोगी ठेवते.
ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक किडनीच्या पेशींना होणारे नुकसान टाळतात आणि शरीरातील जळजळ व सूज नैसर्गिकरीत्या कमी करतात.
अननस पचनास मदत करण्यासोबतच शरीरातील जळजळ आणि सूज कमी करण्यास फायदेशीर ठरते.
लाल द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडंट असते. हे किडनीचे कार्य सुधारण्यास मदत करते आणि शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर टाकते.