संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याणमधील खोणी गावातील एक कुटुंब एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात गेले असता हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हॉटेल चालक व त्याच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या मारहाणीत एक महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित कुटुंबाने हॉटेलमधील रूम खाली केल्यानंतर हॉटेल चालकाने त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हॉटेल चालक व त्याच्या सहकाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. यावेळी आरोपींकडून तुम्ही आगरी समाजाचे लोक खूप माजले आहात” अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करत शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोपही पीडित कुटुंबाने केला आहे.
घटनेनंतर पीडित कुटुंबाने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात हॉटेल चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिला व पुरुषावर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.