Raigad Crime: जीवे मारण्याची धमकी देत मागितली खंडणी; भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

BJP District Vice President Demand Extortion : रायगडमधील एका भाजप नेत्यावर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून एका व्यक्तीला धमकावणे, खंडणीची मागणी करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवून तपास सुरू केला आहे.
RAIGAD CRIME: BJP LEADER BOOKED FOR EXTORTION AND DEATH THREAT CASE
RAIGAD CRIME: BJP LEADER BOOKED FOR EXTORTION AND DEATH THREAT CASE
Published On
Summary
  • रायगड भाजप नेत्यावर खंडणीचा गुन्हा

  • जीवे मारण्याची धमकी देत खंडणी प्रकरण

  • मंगेश दळवी यांच्यावरील FIR

सचिन कदम, साम प्रतिनिधी

रायगडमध्ये एका भाजपच्या नेत्याने भाईगिरी करत एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली. रिव्हॉल्व्हरचा वापर करून जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील ८० हजार रुपये आणि सैन्याची चेन हिसकावल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी रायगड जिल्हा दक्षिण भाजपचे उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्याविरुद्ध पेण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RAIGAD CRIME: BJP LEADER BOOKED FOR EXTORTION AND DEATH THREAT CASE
आंबिवलीत पूजेदरम्यान दोन कुटुंबीयांमध्ये वाद; महिलांची एकमेकांना धक्काबुक्की, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

उपलब्ध माहिती अहवालानुसार, आरोपीने फिर्यादीला मारहाण, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी तसेच खंडणीची मागणी केल्याचा आरोप केला आहे.पेण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून धमकावत मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RAIGAD CRIME: BJP LEADER BOOKED FOR EXTORTION AND DEATH THREAT CASE
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासादरम्यान खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग

या प्रकरणात मंगेश दळवी यांच्यासह अन्य काही जणांनाही आरोपी करण्यात आले असून, पेण पोलीस पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्याचा तपास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. पेण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कुरमुर्ली येथील फिर्यादी मयूर केसरीनाथ वनगे यांच्या फार्म हाऊसमध्ये ही घटना घडली.

पूर्वीच्या वैमनस्यातून मंगेश रघुनाथ दळवी, हरेश कृष्णा दळवी, रूपेश कृष्णा दळवी आणि रंजीत दळवी (सर्व रा. मांगरूळ) यांनी लोखंडी रॉड, पाईप, लाकडी दांडका आणि लोखंडी तलवारीचा वापर करून तक्रारदाराला मारहाण केली. मारहाणीनंतर मंगेश दळवी यांनी जवळील रिव्हॉल्वर तक्रारदाराच्या कपाळावर रोखून जीवे मारण्याची धमकी दिली.

रिव्हॉल्वर तोंडात घालून धमकावल्याचेही फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केलय. या घटनेदरम्यान तक्रारदाराच्या खिशातून खाली पडलेले 80 हजार रुपये रूपेश दळवी यांनी उचलून घेतले. तर हरेश दळवी यांनी गळ्यातील सुमारे पाच तोळ्यांची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com