आंबिवलीत पूजेदरम्यान दोन कुटुंबीयांमध्ये वाद; महिलांची एकमेकांना धक्काबुक्की, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Two Family Clash : कल्याणजवळील आंबिवली येथे एका पूजाविधीदरम्यान दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही पक्षांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, याप्रकरणी तपास सुरू आहे.
AMBIVLI PUJA CLASH VIRAL VIDEO | TWO FAMILIES FILE CROSS COMPLAINTS IN KALYAN
AMBIVLI PUJA CLASH VIRAL VIDEO | TWO FAMILIES FILE CROSS COMPLAINTS IN KALYAN
Published On
Summary
  • आंबिवली पूजेदरम्यान दोन कुटुंबीयांमध्ये वाद

  • आंबिवली व्हायरल व्हिडिओ बातमी

  • कल्याण खडकपाडा पोलिसांकडे तक्रार

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

कल्याणजवळील आंबिवली परिसरात पूजेच्या कार्यक्रमादरम्यान दोन कुटुंबीयांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र वाद आणि नंतर राडा झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालाय.

AMBIVLI PUJA CLASH VIRAL VIDEO | TWO FAMILIES FILE CROSS COMPLAINTS IN KALYAN
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासादरम्यान खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग

मिळालेल्या माहितीनुसार,आंबिवली येथील गणेश पाटील नगर परिसरात आशा शर्मा यांच्या वतीने शिवलिंग स्थापना आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्याच इमारतीत राहणाऱ्या कुटुंबीयांसोबत वाद झाल्याचे सांगितले जात आहे. आशा शर्मा यांनी केलेल्या आरोपानुसार, पूजेदरम्यान झालेल्या वादानंतर त्यांना मारहाण करण्यात आली.

AMBIVLI PUJA CLASH VIRAL VIDEO | TWO FAMILIES FILE CROSS COMPLAINTS IN KALYAN
Crime: लग्न मोडल्याचा सूड, तरुणाने मामाच्या १ वर्षांच्या बाळाचं अपहरण केलं; नंतर...

तसेच वाद मिटविण्यासाठी आलेल्या काही शेजारी महिलांनाही मारहाण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांनी असा दावा केला की, ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापना आणि पूजेचा कार्यक्रम सुरू होता, त्या जागेशी यांचा कोणताही संबंध नव्हता, तरीही वाद निर्माण करण्यात आला. दुसरीकडे, या प्रकरणात त्या कुटुंबियांची भूमिका किंवा प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. खडकपाडा पोलिसांनी सांगितले की, हा दोन कुटुंबीयांतील वाद असून दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत.

दोन्ही पक्षांचे आरोप नोंदविण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना, धार्मिक विषयावर मी भाष्य करणार नाही. मात्र, महिलांना मारहाण झाली असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी केली आहे. या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास आणि त्यानंतर होणारी कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com