Maharashtra News Live Update: यवतमाळच्या टाकळी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू

Marathi Breaking Live Headlines Updates: आज पहिला श्रावणी सोमवार, मुंबईसह अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा, शिवसेना कुणाची यावरील अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On

राजगुरुनगरच्या सिद्धेश्वर मंदिरात महिलांची फुगडी रंगली; अनोख्या पद्धतीने नागपंचमी साजरी

फुगडीच्या तालावर भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.नागपंचमीच्या निमित्ताने मंदिरात महिलांची मोठी गर्दी झाली. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी फुगडी खेळत नागपंचमीचा उत्सव साजरा केला. फुगडीच्या तालावर महिलांनी फेर धरल्याने मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.

बोरामणी तिहेरी हत्याकांड : मुख्य आरोपीच्या पत्नी व दोन मुलांना जामीन

मुख्य आरोपी शंकर मस्केची पत्नी व दोन मुलांचा जामीन मंजूर

राणी मस्के, दीक्षा मस्के आणि नागेश ऊर्फ धीरज मस्के यांना दिलासा

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायालयाचा निर्णय

यवतमाळच्या टाकळी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू

यवतमाळ तालुक्यातील टाकळी येथील तलावात तीन तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असून पियुष यादव, प्रथमेश यादव आणि प्रसाद सातपुते, तिघेही यवतमाळ येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच बचाव व शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूरमध्ये पारंपरिक पद्धतीने नागपंचमी उत्साहात 

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर येथे नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला. गावाजवळील वारुळाची विधिवत पूजा करून केळीचे पान, विडे, नारळ, काकड्या, लिंबू, फुले तसेच लाह्या-फुटाणे व दूध अर्पण करण्यात आले.

चांगला पाऊस, भरघोस पीक आणि शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी नागदेवतेकडे प्रार्थना करण्यात आली. पूजेनंतर ग्रामस्थांनी पारंपरिक ‘बाऱ्या’ म्हणत महादेव मंदिर व जगदीश महाराज मंदिरात पूजा आणि आरती केली.नागपंचमीला शेतकरी व शेतमजूर कामावर न जाण्याची जुनी परंपराही यंदा कायम ठेवण्यात आली. या उत्सवातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा आणि सापांच्या संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

दोडामार्ग घोटगेवाडी पुलावरून मुलगा व महिला वाहून गेली

दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी कोनाळकट्टा या पुलावरून छोटा मुलगा व एक महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे. तिलारी धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने या भागात सध्या पाणी भरलं आहे. कोणाळकट्टा घोटगेवाडी या पुलावर सध्या पाणी आहे या पाण्याचा अंदाज न आल्याने ही महिला व एक छोटा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे. गावातील काही तरुणांनी याचे चित्रकरण केले त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. कोणाळचे उपसरपंच रत्नकांत कर्पे यांनी याबाबतची माहिती पोलीस ठाण्यात दिली आहे

शिरपूरमध्ये कानबाई मातेला भावपूर्ण निरोप... 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात खान्देशची ग्रामदैवत असलेल्या कानबाई मातेला आज मोठ्या उत्साहात आणि वाजतगाजत निरोप देण्यात आला आहे, श्रावण महिन्यातील पहिल्या रविवारी स्थानापन्न झालेल्या या दीड दिवसांच्या पाहुणीला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच विसर्जन मार्गांवर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापुरात पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; शंभू महादेवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला 

माण तालुक्यातील श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी आणि नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.

सराफाच्या दुकानातून सोन्याची चोरी; आरोपी अकोल्यातून जेरबंद

सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास करून फरार झालेल्या आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अकोला शहरातून ताब्यात घेतलंय. आरोपीकडून तब्बल ४७ ग्रॅम ४८ मिलीग्रॅम सोनं, सुमारे ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

नाशिक TCS प्रकरणातील आरोपीला जामीन 

टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या मतीन पटेलला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नाशिकरोड न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.

माळशेज घाट प्रकल्पाची २१ ऑगस्टची जनसुनावणी रद्द; कोल्हेंच्या फोननंतर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय! 

माळशेज घाट–भोरांडे उदंचन जलविद्युत प्रकल्पावरून खासदार अमोल कोल्हे आक्रमक झाल्यानंतर मोठी घडामोड समोर आलीय… पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी पत्रकार परिषदेतुन फोनवरून संवाद साधल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

एक लाख 51 हजार 111 मोदकांच्या महानैव्याद्याची राज्यात 51 केंद्रात निर्मिती

श्री संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर शेगाव साठी मार्गक्रमण करत आहे. . महाराजांची पालखी उद्या 18 ऑगस्ट रोजी खामगावात दाखल होणार असून खामगाव मध्ये पालखीचा अंतिम मुक्काम राहणार असल्याने भव्य दिव्य स्वागत वारकऱ्यांचं तसेच पालखीचं इथे केल्या जाते.. दरम्यान खामगाव मध्ये एक लाख 51 हजार 111 मोदकांच्या महानैवैद्याची महाराष्ट्रातील 51 केंद्रातून निर्मिती करत हा प्रसाद भाविकांना वितरण केल्या जाणार आहे.

मुरबाडमध्ये MIDC च्या जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध 

मुरबाड तालुक्यातील सुपीक शेतजमिनींवर प्रस्तावित एमआयडीसीसाठी प्रशासनाकडून अचानक सुरू करण्यात आलेल्या मोजणीला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय. कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर नोटीस किंवा जाहीर सुनावणी न घेता सुरू करण्यात आलेली मोजणी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून रोखून धरली.

मोताळा येथील ५०० मीटर अंतरावर डंपिंग ग्राउंडला ग्रामस्थांचा तीव्र विरोध... 

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतीमार्फत गावाजवळील सुमारे ५०० मीटर अंतरावर कचरा डेपो उभारण्याच्या प्रस्तावाला परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरण, जलस्रोत, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरचं उपजिल्हा रुग्णालय पाडणार, स्थानिकांची मात्र नाराजी

- विकासाला विरोध नाही मात्र रुग्णालय गावाच्याच परिसरात कुठेतरी उभाराव, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यवस्था करावी, प्रशासनाकडे स्थानिकांची मागणी

- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय इमारत पाडण्यात येणार आहे. प्रस्तावीत त्र्यंबकेश्वर दर्शन पथ तयार करण्यासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे.

कोल्हापूर- गोव्यातून मध्यप्रदेश कडे जाणारा गोवा बनावटीचा अवैध दारू साठा कोल्हापूर पोलिसांनी पकडला

1 कोटी 75 लाखांची दारू जप्त

जयसिंगपूरात सापळा रचून कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

डाक पार्सल लिहिलेल्या ट्रकातून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक

एकूण 1कोटी 95 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील अवैध दारूसाठ्यावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने सिंहगड रोड परिसरात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत १ लाख २४ हजार ६३५ रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

मुंबई- आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

मंत्री भरत गोगावले यांच्या पालक मंत्री घोषणेनंतर महाडमध्ये जल्लोष

फटाके वाजवत गुलाल उधळत केला आनंद व्यक्त

एकच शेठ भरतशेठ, परत परत भरतशेठ अशा दिल्या घोषणा

गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाचा नियुक्तीवर खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया

तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे

मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं ते आपल्याला मान्य करावे लागेल

त्यांनी सर्वसामान्य लोकांचा विचार करून काम करावं

आमचं त्यामध्ये हस्तक्षेप असल्याचं काही कारण नाही

नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला

- जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

- सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसर तर पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, जांभूळमाळ, हरणगाव भागात दुपारी १२.४० मिनिटांनी जाणवले भूकंपाचे धक्के

- तर दिंडोरी तालुक्यातील ननाशी, बागडीचा पाडा परिसरात १२.४५ मिनिटांनी जाणवले भूकंपाचे धक्के

- सातत्याने होत असलेल्या भूकंपांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीचं तीव्र आंदोलन

शहरातील महत्वाचे भूखंड BOT तत्वावर देण्यास महाविकास आघाडीचा विरोध

या संदर्भातला प्रस्ताव उद्या होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत येणार आहे

हा प्रस्ताव सभागृहात येण्याआधीच महाविकास आघाडीकडून विरोध दर्शवला जातोय

यासाठी महाविकास आघाडीने मनपा आयुक्ताना आज भेटीसाठी वेळ घेतली होती

पण ऐनवेळी मनपा आयुक्त डो. सचिन ओंबासे यांची तब्येत खराब असल्याने ते पालिकेत आले नाही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

कोथरूड येथील काल घेतलेल्या मेळाव्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल

बारा वर्षांपूर्वी सर्वजण मोदी मोदी करत होते.राहुल गांधींना सर्वजण पप्पू पप्पू म्हणता म्हणता आता पप्पा पप्पा म्हणायला लागतील हे दिवस दूर नाहीत असा टोला ही लगावला आहे

समृद्धी महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड ते जालना समृद्धी महामार्गाच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे.या महामार्गासाठी नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने घेतल्या आहेत. परंतु नियमानुसार या बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाहीये.

रत्नागिरी- श्रावण मासानिमित्त रत्नागिरीत काढण्यात आली कावड यात्रा

सकल हिंदु समाजाकडून आयोजन

हिंदु संस्कृतीतील पवित्र श्रावण मासानिमित्त रत्नागिरीत कावड यात्रेचं आयोजन

पायी कावड यात्रेची सुरुवात खेडशी येथून

या कावड यात्रेसाठी भारतातील पवित्र नद्या आणि सरोवरांचं जल संकलित

या कावड यात्रेत महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग

पुणे- शरद पवार आणि नितीन गडकरी आज एकाच मंचावर

पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते लावणार उपस्थिती

आठवणींची ओंजळ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दोन्ही नेते एकाच मंचावर

आज संध्याकाळी पुण्यात पार पडणार पुस्तक प्रकाशन सोहळा

पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात साप

पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात साप शिरल्याची घटना घडलीये.. विशेष म्हणजे आरोग्य केंद्रातल्या रूममधल्या अंथरुणात हा साप निदर्शनास आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य केंद्राच्या इमारत परिसरात रात्री लाईटची व्यवस्था नाही असे स्थानिकांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

महाराष्ट्राच्या विकास कामांवर केली चर्चा

मराठा समाजातील मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारे यांच्यावर जहरी टीका.

मराठा समाजातील मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारे यांच्यावर जहरी टीका.

नवनाथ वाघमारे ला टकमक टोकावरून खाली ढकलून द्या आणि त्याच्या तोंडामध्ये शिषे ओतल पाहिजेगंगाधर काळकुटे.

Nashik : नाशिकमध्ये ठाकरे सेनेचा जन आक्रोश मोर्चा

ठाकरे सेनेच्या जन आक्रोश मोर्चाला खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मध्ये सुरुवात

जन आक्रोश मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक त्याचबरोबर महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग

लहान मुलांसह महिला या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर.

चिपळुणातील गांधारेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील पुरातन श्री देव गांधारेश्वर मंदिरात श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या जागृत शिवमंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. श्रावण सोमवारनिमित्त भगवान शंकराच्या दर्शनासाठी चिपळूणसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले आहेत.

येरवड्यात ‘लव्ह ट्रँगल’चा थरार! भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला

येरवड्यात ‘लव्ह ट्रँगल’चा थरार! भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला

माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?’ या संशयातून रस्त्यात हल्ला

नांदेड जिल्ह्यात नागपंचमी सण उत्साह साजरा

नांदेड जिल्ह्यात नागपंचमी सण उत्साह साजरा.

नागदेवता आणि वारुळाची पूजा करण्यासाठी महिलांनी केली गर्दी

Palghar : पालघरच्या बोईसर एमआयडीसीत ब्लास्ट

पालघरच्या बोईसर एमआयडीसीत ब्लास्ट . बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीत ब्लास्ट. उत्पादन सुरू असताना ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती . अपघातात काही कामगार जखमी झाल्याची शक्यता . प्रशासन घटनास्थळी दाखल .

श्रावणी सोमवार निमित्त कुणकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी

श्रावणी सोमवार निमित्ताने दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिरात पहिल्याच श्रावण सोमवारी भाविकांनी गर्दी केली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्टच्यावतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे.

Solapur: सोलापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

सोलापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय.

शहरातील केशवनगर, फ़ॉरेस्ट भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने 8 वर्षीय चिमुकल्यासह एका महिलेवर हल्ला केला.

याशिवाय अन्य 3-4 नागरिक या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती आहे.फ़ॉरेस्ट परिसरात राहणारा जहीर अब्बास शेख हा आपल्या घराच्या बाहेर खेळत होता.

तर सोजर काटे या घराबाहेर बसल्या होत्या.

Yavatmal: आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची आश्रमशाळांना अचानक भेट

यवतमाळ -

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची आश्रमशाळांना अचानक भेट

आश्रमशाळेतील विद्यार्थी संख्या, सुविधांबाबत शाळा प्रशासनाची घेतली झडती

विद्यार्थ्यांसोबत साधला मनमोकळा संवाद

Sangli: सांगलीच्या 32 शिराळ्यात नागदेवतेच्या मानाच्या पालखीची पारंपरिक पूजा

सांगलीच्या 32 शिराळ्यात नागदेवतेच्या मानाच्या पालखीची पारंपरिक पूजा

नागपंचमीच्या निमित्ताने सांगलीच्या 32 शिराळ्यात नागदेवतेच्या मानाच्या पालखीची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली.

गोरक्षनाथ महाराजांनी सुरू केलेली जीवंत नागाच्या पूजेची परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे.

मानाची पालखी महाजन कुटुंबीयांच्या घरातून निघाल्यानंतर गुरुवार पेठ, कुरणे गल्लीमार्गे मरीमाई मंदिरात नेण्यात येते.

त्यानंतर ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात पालखीची पूजा व आरती करण्यात आली.. या सोहळ्यास भाविकांची मोठी उपस्थिती होती..

Pune: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

पुणे -

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी चे आंदोलन

काही महिन्यांपासून पुणे शहरातील खड्डे, मुठा नदीतील जलपर्णी आणि महापौर बंगल्याच्या नामांतर या विषयी राष्ट्रवादी चे आंदोलन

Raigad: खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला

खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला आहे.

पुलाला संरक्षण कठडे नसून भराव खचला आहे.

पुलाच्या संरक्षण भिंती ढासळल्या आहेत. त्यांना अनेक ठिकाणी तडे देखील गेले आहेत.

सद्या जीव धोक्यात घालून ग्रामस्थ या पुलावरून ये जा करीत असले तर हा पुल कोसळला तर तुकसई गाव आणि तीन वाड्यांचा संपर्क तुटणार आहे.

लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करावी आणि नवीन पुल देखील बांधावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Amravati: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

अमरावती -

अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

अमरावतीकरांची पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद विमानसेवेची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.

मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता या महत्त्वाच्या शहरांशी थेट हवाई संपर्काची मागणी जोर धरत आहे.

मात्र, बेलोरा विमानतळावर अद्याप नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने नवीन विमानसेवा सुरू करण्यास अडथळे निर्माण होत आहेत.

Nagpur: नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

नागपूर -

- नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

- श्रावण सोमवार निमित्य सकाळपासूनचं दर्शनासाठी गर्दी झाली आहे...

- सकाळीच आकर्षक अशी रोषणाई, आणि सजावट मंदिर परिसरात करण्यात आली आहे.. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाल परिसरात असललेल्या या कल्याणेश्वर शिव मंदिराला भोसले कालीन इतिहास आहे.

- श्रावणात मंदिरात भाविकांची दिवसभर गर्दी असते... त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून तयारी केली जाते....

Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

त्र्यंबकेश्वर-

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने हा दुग्ध शर्करा योग भाविकांसाठी ठरत आहे पर्वणी

देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये भगवान शंकराच्या दर्शनासाठी दाखल

प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात

Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला

नागपूर

- ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला

- तिसऱ्या टप्प्याचे मूल्यांकन फेब्रुवारीमध्ये पूर्ण होऊनही निकाल अद्याप जाहीर नाही

- राज्यातील तब्बल २ हजार ६१० शाळा पुरस्काराच्या प्रतीक्षेत

- निकालाच्या प्रतीक्षेत शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी

- स्पर्धेच्या पुरस्कारांसाठी तब्बल ७२ कोटी २२ लाख रुपयांची तरतूद

- स्पर्धेचे नियोजन, प्रचार-प्रसार आणि अंमलबजावणीसाठीही १४ कोटी ५० लाखांची तरतूद

- मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतरही निकाल जाहीर होत नसल्याने सहभागी शाळांचा हिरमोड

 Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर

नागपूर

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर

- राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणूक सहप्रभारी म्हणून जबाबदारी

- सहप्रभारी झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज पहिला राजस्थान दौरा

- राजस्थान आगामी निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाची रणनिती ठरवण्यासाठी आज बैठक

- केंद्रीय भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राष्ट्रीय स्तरावरची महत्त्वाची जबाबदारी...

Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक

माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक

JTL कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली मनसे स्टाईलमध्ये समज

व्हिडीओ होत आहे व्हायरल

Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

गडचिरोली -

कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

गडचिरोलीच्या तरुणांना कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराची नवी दारे

कौशल्य शिका, आत्मविश्वास वाढवा; रोजगाराच्या संधी साधा

उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य आत्मसात करा; तरुणांना संदेश

कौशल्य विकासातून तरुणांच्या हाताला काम, उद्योजकतेलाही चालना

Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर

पुणे -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर

पुण्यातील सिंबायोसिस महाविद्यालयात "रोड टू विकसित भारत" या विषयावर गडकरी यांचे व्याख्यान

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान यांचा वतीने पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार एस के कुलकर्णी यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार

नितीन गडकरी यांच्या दौऱ्याचा पार्श्वभूमीवर मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com