Pune Mhada Lottery Saam tv
मुंबई/पुणे

म्हाडाकडून बंपर लॉटरी; पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर, आजच अर्ज करा

MHADA Lottery Pimpri Chinchwad: पुणे म्हाडाकडून ६,१६८ घरांसाठी सोडत जाहीर. २० ते ४० लाखांत घर मिळणार. ३१ ऑक्टोबर २०२५ अर्जाची अंतिम तारीख.

Bhagyashree Kamble

  • पुणे म्हाडा मंडळानं ६,१६८ घरांची सोडत काढली.

  • पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सातारा, सोलापूर अन् कोल्हापूरात घरे उपलब्ध.

  • २० लाखांत घर मिळणार.

मुंबई - पुण्यात घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. मात्र, गगनाला भिडणाऱ्या घरांच्या किंमतीमुळे घर घेण्याचं स्वप्न लवकर पूर्ण होत नाही. घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा सज्ज झाली आहे. म्हाडाच्या पुणे विभागाच्यावतीनं साडेचार हजार घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या मंडळाअंतर्गत पुणे, सांगली, सातारा, सोलापूर तसेच कोल्हापुरात घरांची लॉटरी निघाली आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील म्हाडाच्या घरांच्या किंमती किती? पाहुयात.

पुणे महापालिका क्षेत्रात १५३८, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात १५३४,आणि पुणे महानगर प्रदेशविकास प्राधिकरणमध्ये १११४ असे एकूण ४१८६ सदनिका आहे.तर म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अस १६८३ सदनिका तर म्हाडा PMAY योजनेत २९९ असे एकूण ६१६८ सदनिकांसाठी सोडत निघाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांत घरकुलांसाठी तीन सोडती काढल्या असल्याची माहिती आहे. यामुळे सर्वसामान्यांना नक्कीच फायदा होईल. पिंपरी चिंचवड शहराचा वेगानं विकास होतोय. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसरातील भागांमध्ये घरांची सोडत निघाली आहे. पिंपरी चिंचवड शहराजवळील चाकण आणि नेरे परिसरात म्हाडाच्या नवीन प्रकल्प राबविण्याचे नियोजन सुरूये, अशी माहिती समोर आली आहे.

म्हाडाकडून पीएमआरडीएच्या हद्दीतील घरांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. सोडतीसाठी अर्जाची प्रारूप यादी ११ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पुणे म्हाडा मंडळाकडून सोडत जाहीर केली. या घरांची किंमती २० लाखांपासून सुरू होत आहे. २० लाखांपासून ते ४० लाखांपर्यंत या घरांच्या किंमती आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निष्ठावान राहिलो ही आमची चूक होती का? पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वेमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य शनीच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 'या' राशींच्या घरी येणार लक्ष्मी, सोन्यासारखे दिवस होणार सुरु

Post Meal Walking Benefit: जेवल्यानंतर १० मिनिटे चालल्यावर होतात जबरदस्त फायदे

Manoj Jarange: नार्कोटेस्टला येतो म्हणणारे लपलेत; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT