MHADA Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Lottery: ठाण्यात म्हाडाचं फक्त १३ लाखात घर! कोणत्या भागात किती घरे?

Thane Mhada Homes Lottery: ठाण्यात स्वतः चे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. ठाण्यात विविध ठिकाणी घरांसाठी लॉटरी निघाली आहे.

Siddhi Hande

मुंबईत स्वतः चे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु प्रत्येकाला हे घर खरेदी करणे शक्य होत नाही. या नागरिकांसाठीच म्हाडा लॉटरी जाहीर करते. म्हाडाने नुकतीच ५३६२ घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. ही लॉटरी ठाणे, कल्याण, डोंबिवलीमधील घरांसाठी निघाली आहे. ठाण्यात तुम्हाला तुमच्या हक्काचे घर मिळणार आहे. ठाण्यात कोणत्या भागात किती घरे आहेत आणि या घरांच्या किंमती किती असणार आहे याबाबत आम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत.

ठाण्यात कोणत्या भागात किती घरे? घरांच्या किंमती काय? (Thane Mhada Lottery)

स्कायलार्क इन्फ्रो स्ट्रक्चर, कौसा, ठाणे येथे १ घरासाठी लॉटरी निघणार आहे. या घरांची किंमत २०५८२०० रुपये असणार आहे.

याचसोबत ग्लोरी टाऊनशिप एलएलपी, डायघर,ठाणे येथे २ घरांची सोडत निघणार असून या घरांची किंमत २३२४४०० रुपये असणार आहे.

के. एम डेव्हलपर्स, ओवळे ठाणे येथे अल्प उत्पन्न गटासाठी घरांची सोडत निघणार आहे. एकूण १० घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. या घरांची किंमत साधारणपणे १६२४५०० ते २२४२१०० असणार आहे.

मेट्रो ड्रीम होम्स, डायघर येथे एकूण २८ घरांसाठी सोडत निघाली आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ही सोडत असणार आहे. या घरांची किंमत १५८९१०० ते १६५५९०० रुपये असणार आहे.

आशर डेव्लपर्स, ठाणे येथे अल्प उत्पन्न गटासाठी १२ घरांसाठी लॉटरी निघणार आहे. या घरांची किंमत ३३५५००० ते ३३९६९०० रुपये असणार आहे.

उन्नती असोसिएट्स, ठाणे येथे अल्प उत्पन्न गटासाठी लॉटरी निघाली आहे. या घरांची किंमत २०८४२०० ते २१४६४०० रुपये असणार आहे. एकूण ३२ घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे.

होराइझन प्रोजेक्ट प्रा. लि. उसरघर, सांडप, ठाणे, रुणवाल प्रोजेक्ट येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४१ घरांसाठी लॉटरी निघणार आहे.या घरांची किंमत १३४०५०० रुपये असणार आहे.

मिरारोड (Mira Road) येथे अनेक घरांसाठी लॉटरी निघाली आहे. कावेसर येथे एकूण १८ घरांसाठी लॉटरी निघाली आहे. या घरांची किंमत ५१७०० रुपये आहे. ठाणे पत्रकार संघासाठी अल्प उत्पन्न गटासाठी २५ जागांसाठी सोडत निघणार आहे. या घरांची किंमत २१२२९९३ रुपये असणार आहे.

आशर डेव्हलपर्स माजिवडे, ठाणे येथे अत्यल्प उत्पन्नासाठी ४१ घरांसाठी सोडत मिळणार आहे. या घराची किंमत ४५०९७५० रुपये असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT