Mhada Homes: नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, फक्त १४ लाखांत घर; म्हाडाकडून घरांची बंपर लॉटरी

MHADA affordable homes at Navi Mumbai: म्हाडा कोकण मंडळाने नवी मुंबईत 293 स्वस्त घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. किंमती ₹14 लाखांपासून सुरू असून विविध भागांतील घरांचा समावेश आहे. अर्ज करण्याची सुवर्णसंधी!
MHADA Housing Lottery
MhadaSaam tv
Published On

मुंबई परिसरात आपलं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण अव्वाच्या सव्वा घरांच्या किमती पाहून आपण मुंबईत घर घेणं टाळतो. दरम्यान, ठाणे, कल्याणनंतर आता नवी मुंबईतील नागरिकांचंही घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने नवी मुंबईतील काही भागांमध्ये २९३ घरांसाठी लॉटरी काढली आहे. या घरांची किंमत फक्त १४ लाखांपासून सुरू होत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांसाठी निश्चितच ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने ५,३६२ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यामध्ये नवी मुंबईतील दिघा, सानपाडा, नेरुळ, घणसोली आणि गोठेघर या भागांचाही समावेश आहे. या भागातील एकूण २९३ घरांचा समावेश असणार आहे. नवी मुंबईत घर खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे.

MHADA Housing Lottery
Heart Attack: शाळेत टिफिन उघडताच कोसळली; ९ वर्षीय चिमुकलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू, आईनं हंबरडा फोडला

नवी मुंबईतील बीकेएस गॅलेक्सी रिएलेटर्स LLP दिघा या प्रकल्पातील घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. अनामत रक्कम आणि अर्जाचे शुल्क, असे एकूण ५५९० रूपये रूपये भरावे लागणार आहेत. या प्रकल्पात ११२ घरे असून, घरांची किंमत १८ लाखांपासून सुरूवात आहे.

नवी मुंबई Pyramid developers नेरूळ येथील घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहे. घरांची संख्या १८ असून, किंमत २३ लाखांपासून सुरूवात आहे. यासाठी अनामत आणि अर्जाची रक्कम असे एकूण १०,५९० भरावे लागणार आहे.

DPVG Ventures LLP सानपाडा, नवी मुंबईत अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटासाठी १९ घरे आहेत. या प्रकल्पातील अत्यल्प गटातील घरांची किंमत १४ लाखांपासून सुरू होत आहे. या उत्पन्न गटासाठी २ घरे आहेत. तसेच याचं क्षेत्रफळ २९.६ चौ.मी इतकं आहे.

तर, अल्प गटासाठी १७ घरे असून, या घरांची किंमत १८ लाखांपासून सुरू होत आहे. घराचं क्षेत्रफळ ३७.१७२ ते ४९.९१८ चौरस मीटर इतकं आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५,५९० रूपये आणि अल्प उत्पन्न गटासाठी १०,५९० रुपये भरावे लागणार आहे.

MHADA Housing Lottery
Shocking: नवऱ्याचं अफेअर, सासरा जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवायचा; चिमुरडीसह महिलेनं आयुष्य संपवलं

नवी मुंबईतील घणसोली येथे निलकंठ इन्फ्राटेक प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी १८ घरे उपलब्ध आहेत. या घरांची किंमत १६ लाखांपासून सुरूवात असून, घराचे क्षेत्रफळ ३२.५२२ ते ४८.१९४ चौरस मीटर इतके आहे. अनामत आणि अर्जाची रक्कम असे एकूण १०,५९० भरावे लागणार आहे.

सानपाडा, नवी मुंबई येथील कामधेनु ग्रँड्युअर या प्रकल्पात १७ घरे उपलब्ध आहेत. या घरांची किंमत २३लाखांपासून सुरूवात होत असून, घराचे क्षेत्रफळ ४२.३० ते ४९.९२ चौरस मीटर इतके आहे. अनामत आणि अर्जाची रक्कम असे एकूण १०,५९० भरावे लागणार आहे.

निलकंठ इन्फ्राटेक, मौजे घणसोली या ठिकाणी २१ घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत. या घरांची किंमत २३ लाखांपासून सुरूवात होत आहे. घराचे क्षेत्रफळ ३६.३२३ ते ४६.२२८ चौरस मीटर आहे. तर, अनामत आणि अर्जाची रक्कम असे एकूण १०,५९० भरावे लागणार आहे.

गोठेघर येथे ८८ घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत. या घरांची किंमत ३६ लाखांपासून सुरूवात होत असून, घराचे क्षेत्रफळ ४७.८५ चौरस मीटर इतके आहे. तर, अनामत आणि अर्जाची रक्कम असे एकूण १०,५९० भरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com