
९ वर्षीय चिमुकलीचा शाळेतील मधल्या सुट्टीत ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका गावातून उघडकीस आली आहे. ९ वर्षीय चिमुकली शाळेत गेली. नंतर ११ वाजण्याच्या सुमारास टिफीन खायला बसली. मात्र, त्याचवेळी तिच्या छातीत जोरात कळ मारली आणि खाली जमिनीवर कोसळली. तिला तातडीने रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राची कुमावत (वय वर्ष ९) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. प्राची दांतारामगढ परिसरातील रहिवासी होती. आदर्श विद्या मंदिर शाळेत ती इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे बुधवारी प्राची शाळेत गेली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मधल्या सुट्टीत ती डबा खायला बसली. टिफीन उघडताच तिच्या छातीत कळ मारली आणि ती खाली कोसळली. विद्यार्थ्यांनी याची माहिती शिक्षकांना दिली.
शिक्षकांनी चिमुकलीच्या पालकांना याची माहिती दिली. तसेच तिला तातडीने रूग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शाळेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले की जेवणाच्या सुट्टीच्यावेळी प्राची इतर मुलांप्रमाणे जेवण्यासाठी तिचा टिफिन उघडत होती. मात्र, अचानक ती खाली कोसळली. त्यानंतर तिला रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
९ वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण गावात शोककला पसरली आहे. याआधीही गावात १२ वर्षांच्या मुलाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. यामुळे गावकऱ्यांना धक्का बसला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, ह्रदयविकाराच्या झटक्यानं कमी वयातच चिमुकल्यांचा मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.