Emotional Video Saam Tv
मुंबई/पुणे

Men's Day: 'होय पुरूषही रडतात...', बोरिवली स्टेशनवर ढसाढसा रडणारा तो तरुण कोण? VIDEO ची होतेय चर्चा

Viral Emotional Video: 'मेन्स डे'च्या निमित्ताने सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एक तरुण रेल्वे स्टेशनवर बसून ढसाढसा रडतोय. तरुणाला रडताना पाहून नेटकरी देखील इमोशनल झाले आहेत.

Priya More

Summary:

  • बोरिवली स्टेशनवर बसून रडतानाचा तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

  • मेन्स डेच्या दिवशी हा व्हिडीओ सर्वाचे लक्ष वेधून घेतोय

  • हा व्हिडीओ मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावरील आहे

  • 'मर्द को भी दर्द होता है' अशी चर्चा या व्हिडीओच्या निमित्ताने होतेय

एखादी गोष्ट मनाला लागली, कुणी रागावलं, कुणाशी भांडण झालं किंवा एखाद्या गोष्टीत अपयश आलं की महिला चटकन इमोशनल होतात आणि ढसाढसा रडतात. व्यक्त होत असताना आपल्या मनात असलेले दु:ख महिला रडून बाहेर काढताना आपण नेहमी पाहिले आहे. महिलांना रडताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल पण पुरूषांना रडताना खूपच कमी वेळा पाहिले असेल. एखाद्या पुरूषाला रडताना पाहणं आपल्याला अवघड जाते. पुरूष रडणे हे कमकुवत असल्याचे लक्षण मानले जाते. पुरूष धीट मनाचा असतो त्यामुळे तो रडत नाही असे आपण नेहमी ऐकत आलो आहे.

पण पुरूषही रडतात याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच इमोशनल करत आहे. व्हिडीओमधील तरुणाचं ढसाढसा रडणं पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ जुना असला तरी देखील आज 'मेन्स डे'च्या निमित्ताने तो पु्न्हा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? आणि तो तरुण का रडत होता? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारा तरुणाचा हा व्हिडीओ मुंबईतील आहे. संध्याकाळच्या वेळी मुंबईतल्या बोरीवली रेल्वे स्थानकावर एका कट्ट्यावर बसून हा तरुण ढसाढसा रडत आहे. हा तरुण मनात काही तरी विचार करून अगदी लहान मुलं रडतात तसं रडत आहे. आपण रडतोय हे कळू नये यासाठी तो सतत तोंडावर हात लावताना दिसत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक जण आहेत याचा विचार न करता हा तरुण ओक्साबोक्शी रडत आहे. ऑफिसवरून घराच्या दिशेने हा तरुण निघाला असावा त्याची ट्रेन मिस झाली असावी त्यामुळे तो रडत असावा, त्याच्या आयुष्यात काही तरी भयंकर घडलं असावं त्यामुळे तो रडत असावा, त्याची नोकरी गेली असावी किंवा त्याला जवळची व्यक्ती सोडून गेली असावी त्यामुळे तो रडतोय असा विचार हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या मनात येत आहे.

हा व्हिडीओ पाहून पुरूषांनाही वेदना होतात, त्यांनाही मन असते आणि ते देखील रडतात अशाप्रकराच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या आहेत. खरं तर आपल्या मनातून भावना कोणत्याना कोणत्या पद्धतीने व्यक्त करायच्या असतात. मनात साचलेले दु:ख आपण कोणत्याही मार्गाने व्यक्त करू शकतो. काही जण बोलून व्यक्त होतात तर काही जण रडून व्यक्त होतात. रडून थोडसं का होईना मन हलकं होतं असे अनेकदा म्हटलं जातं. पण या तरुणाचे हे रडणं मन हेलावून टाकणारे आहे. हा व्हिडीओ पाहून कुणालाही वाटेल की मी त्याठिकाणी असतो तर त्या तरुणाला धीर दिला असता, त्याचे डोळे पुसले असते, त्याचे दु:ख समजून घेतले असते, त्याला घट्ट मिठी मारून काळजी करू नको भावा सगळं काही ठिक होईल असे त्याला सांगितले असते.

या व्हायरल व्हिडीओ तिलक दुबे या कंटेंट क्रिएटरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ आज सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. या व्हिडीओवरून इतकेच कळते की, पुरूषांच्याही आयुष्यात खूप दु:ख असतात, ते देखील अडचणीत असतात, कितीही कठीण प्रसंग आला तरी ते मोठ्या धीराने तोंड देतात. पण संकटांशी दोन हात करत असताना अनेकदा त्यांचा देखील धीर सुटतो आणि ते देखील रडतात. काही वेळा त्यांच्या डोळात फक्त पाणी येते, काही वेळा त्यांचे डोळे लालसर होतात तर काही वेळा ते ढसाढसा रडतात. अशाच या तरुणाच्या व्हिडिओने सर्वांना विचार करायला भाग पाडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्यांचा धुमाकूळ; घराच्या अंगणात एक, दोन नव्हे तर तीन बिबटे|VIDEO

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार, गरजेनुसार अधिनियमात बदल करण्याची तरतूद

Nitish Kumar: बिहारमध्ये नवं सरकार स्थापन होण्याआधीच राजकीय घडामोडी वाढल्या; नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला बेदम मारहाण

टीम इंडिया आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार? U-19 World Cup चं वेळापत्रक समोर, पहिला सामना कधी?

SCROLL FOR NEXT