Shocking : मुंबई हादरली! पाणी भरण्यावरून वाद पेटला, मच्छर मारायचा स्प्रे तोंडावर मारून शेजाऱ्याची हत्या

Virar Crime News : विरारमध्ये पाणी भरण्याच्या वादातून महिलेने शेजाऱ्याच्या तोंडावर मच्छर मारण्याचा स्प्रे फवारला. दुर्घटनेत शेजाऱ्याचा मृत्यू. महिलेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.
Shocking : मुंबई हादरली! पाणी भरण्यावरून वाद पेटला, मच्छर मारायचा स्प्रे तोंडावर मारून शेजाऱ्याची हत्या
mumbai CrimeSaam Tv
Published On
Summary
  • विरारमध्ये पाणी भरण्याच्या वादातून शेजाऱ्याची हत्या

  • महिलेने मच्छर-नाशक स्प्रे तोंडावर फवारल्यानं शेजाऱ्याचा मृत्यू.

  • आरोपी महिलेला अटक करून गुन्हा दाखल

  • महिलेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

विरारमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. पाणी भरण्याच्या वादातून एका महिलेने तिच्या शेजाऱ्याची हत्या केली आहे. धक्कदायक म्हणजे या महिलेने कोणत्याही धारदार शस्त्राचा वापर केला नाही तर मच्छर मारण्याचा स्प्रे फवारला. या दुर्घटनेत शेजारी राहणाऱ्या ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेकडील जेपीनगर येथील बिल्डिंग नंबर १५ मध्ये उमेश पवार (५७) कुंदा तुपेकर (४६) या दोन स्थानिक रहिवाशांमध्ये नेहमीच पाण्याच्या वापराबाबत वाद व्हायचा. मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास या दोन्ही शेजाऱ्यांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या कडाक्याच्या भांडणात कुंदा तुपेकर यांना राग अनावर झाला.

Shocking : मुंबई हादरली! पाणी भरण्यावरून वाद पेटला, मच्छर मारायचा स्प्रे तोंडावर मारून शेजाऱ्याची हत्या
Maharashtra Political News : शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच दादांनी पळवला, भोरमध्ये महायुतीत संघर्ष टोकाला

संतापलेल्या कुंदा यांनी रागारागात मच्छर मारण्याचा डासनाशक स्प्रे शेजाऱ्याच्या तोंडावर फवारला. त्यामुळे ते बेशुद्ध पडले. नागरिकांनी तात्काळ उमेश यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वी उमेश यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून तिच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Shocking : मुंबई हादरली! पाणी भरण्यावरून वाद पेटला, मच्छर मारायचा स्प्रे तोंडावर मारून शेजाऱ्याची हत्या
Maharashtra Politics : मराठवाड्यात सगे-सोयऱ्यांचे वर्चस्व, आमदारांची - मंत्र्यांची मुले-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

या प्रकरणी पोलिसांनी म्हटले की, पाणी भरण्याच्या किरकोळ वादातून ही घटना घडली आहे. बऱ्याच काळापासून या दोन्ही शेजाऱ्यांमध्ये टोकाचे वाद निर्माण झाले. याप्रकरणी आम्ही सदोष मनुष्यवध प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी महिला कुंदा तुपेकर हिला अटक केली आहे. असे अर्नाळा सागरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com