High Speed Connectivity Saam Tv
मुंबई/पुणे

6 Lane High Speed Highway: मुंबईत ६ पदरी महामार्ग होणार, केंद्राकडून ४५०० कोटींचा निधी मंजूर, कसा आहे मेगाप्लान?

High Speed Connectivity: महाराष्ट्रामध्ये ग्रीनफिल्ड महामार्गाला मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या प्रोजेक्टसाठी ४५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

Priya More

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जेएनपीए बंदर (पागोट) ते चौकदरम्यान सहा पदरी प्रवेश नियंत्रित राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली. यासाठी केंद्र सरकारने तब्बल ४५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा नवीन कॉरिडॉर पागोटे गावाजवळील जेएनपीए बंदरापासून सुरू होईल आणि मुंबई-पुणे महामार्गावर संपेल. हा नवीम कॉरिडॉर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे.

केंद्राकडून ४५०० कोटींची मंजुरी -

महाराष्ट्रातील जेएनपीए बंदर (पागोटे) ते चौकदरम्यान नवीन ६ लेन ग्रीन फील्ड प्रोजेक्ट कॉरिडॉरला पीएम मोदींच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली. हा प्रोजेक्ट बीओटी या तत्त्वावर विकसित केला जाणार आहे. यासाठी तब्बल ४५००.६२ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. हा ऐवढा खर्च केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.

पायाभूत सुविधांचा विकास -

पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन तत्त्वांअंतर्गत भारतातील प्रमुख आणि लहान बंदरांशी जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास हा एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजनाच्या प्रमुख प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे. जेएनपीए बंदरातील कंटेनरचे वाढते प्रमाण आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा विकास या सर्व गोष्टी लक्षात घेता या प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरज आहे. त्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारकडून पाऊलं उचलली जात आहेत.

कनेक्टिव्हिटीची गरज वाढणार -

सध्या पळस्पे फाटा, डी-पॉईंट, कळंबोली जंक्शन, पनवेलसारख्या शहरी भागातील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे जेएनपीए बंदरातून निघालेल्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग-४८ चा मुख्य सुवर्ण चतुर्भुज (जीक्यू) टप्पा आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पोहोचायला तब्बल २ ते ३ तास लागतात. २०२५ मध्ये नवी मुंबई एअरपोर्ट कार्यान्वित होणार आहे. त्यावेळी थेट कनेक्टिव्हिटीची गरज आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसारच कनेक्टिव्हिटीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जेएनपीए बंदर आणि नवी मुंबई एअरपोर्ट जोडण्याची लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा प्रोजेक्ट तयार केला जात आहे.

मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा हायवेला जोडणार -

हा नवीन कॉरिडॉर पागोटे गावाजवळील जेएनपीए बंदरपासून सुरू होईल आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर संपणार आहे आणि मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई -गोवा महामार्ग यांना जोडला जाणार आहे. हा नवीन कॉरिडॉर उरण-चिरनेर महामार्ग (नवी मुंबईपासून आमरा मार्गाने सुरू होणारा), गोवा महामार्ग आणि पुणे एक्स्प्रेसवे या मार्गांवरून जाणार आहे ज्यामुळे महामार्गावर प्रवेश मिळतील.

२०-३० मिनिटांच्या वेळेत बचत -

केंद्र सरकारने सांगितले की, या प्रोजेक्टमुळे मुंबई ते गोव्याकडे जाणाऱ्या महामार्गापर्यंतचा प्रवास वेळ मुंबई ट्रान्स हार्बर ब्रिज म्हणजे अटल सेतूपासून फक्त २०-३० मिनिटांपर्यंत कमी होऊन कनेक्टिव्हिटी वाढेल. नवीन ६ लेन ग्रीन फील्ड प्रोजेक्ट कॉरिडॉरमुळे बंदरांची कनेक्टिव्हिटी चांगली होईल आणि सुरक्षित आणि कार्यक्षम मालवाहतुकीत मदत होईल. हा प्रोजेक्ट मुंबई आणि पुण्याच्या आसपासच्या विकसनशील प्रदेशांमध्ये वाढ, विकास आणि समृद्धीचे नवीन मार्ग खुले करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वे विस्कळीत प्रवाशांची मोठी गर्दी

Cholesterol signs on face: तुमच्या त्वचेमध्ये हे बदल दिसले तर समजा कोलेस्ट्रॉल वाढलंय; 8 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Artist Death : मनोरंजन विश्वावर शोककळा, सोशल मीडिया स्टारनं घेतला अखेरचा श्वास

मध्य रेल्वेवर प्रवाशांचा खोळंबा; कुर्ल्यापुढे लोकल सेवा बंद|VIDEO

Morning Weight Loss Drink: जिऱ्याचं पाणी की सब्जाचं पाणी? वजन झटपट कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक सर्वात बेस्ट?

SCROLL FOR NEXT