Dhanshri Shintre
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा महाराष्ट्र आणि भारताच्या प्रगतीला चालना देणारा एक महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प आहे.
२०२५च्या जूनपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी जलद प्रगती केली जात आहे.
गौतम अदानी यांनी रविवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पस्थळी भेट देऊन प्रगतीचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले.
अदानी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाहणीदरम्यान विश्वास व्यक्त केला की, हा विमानतळ शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करेल.
१६,७०० कोटी रुपये खर्च करून बांधलेले नवी मुंबई विमानतळ मुंबईच्या मुख्य विमानतळाची गर्दी कमी करण्यासाठी उभारले जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ १,१६० एकर क्षेत्रावर विकसित करण्यात येत आहे.
अदानी समूहाने सांगितले की, नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन जून २०२५ मध्ये होण्याची योजना आहे.