Top 5 News : लाडक्या बहिणींचा अपेक्षाभंग, महिला आक्रमक; पश्चिम महाराष्ट्रातील टॉप ५ न्यूज

Western Maharashtra Top 5 News VIDEO : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर आणि कोल्हापूरमधील घटनांचा आढावा.
western Maharashtra top 5 news
western Maharashtra top 5 newssaam tv
Published On

लाडक्या बहिणींची निराशा

लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र प्रत्यक्षात 1500 रुपये देण्यात येत असल्याने महिलांचा अपेक्षाभंग झालाय, असा आरोप साताऱ्यात ठाकरे गटाच्या महिलांनी केला आहे. यावेळी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सरकारकडून आश्वासन पूर्ततेची मागणी केली.

नेपाळी हॉटेल कामगारांना बेदम मारहाण

नेपाळी हॉटेल कामगारांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून त्यांना काठी आणि लोखंडी सळीने मारहाण केल्याचा प्रकार कोल्हापुरातील माले फाटा येथील बाबा हॉटेलमध्ये घडला. हॉटेल चालक टिपू सुलतान खतीब याच्यासह तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

western Maharashtra top 5 news
Crime : मंगळसूत्र चोरीच्या घटनेने तिच्या आयुष्याचं मंगळसूत्र हिरावलं; चोरट्यांचा पाठलाग करणे पतीच्या जीवावर बेतला

सोलापुरात वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात एका 70 वर्षांच्या वृद्धाने किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सोपान राऊत असं या वृद्धाचं नाव असून ते आरणगावचे रहिवासी आहेत. तसचं ते स्वतःच्या मुलाविरोधात तक्रार देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

western Maharashtra top 5 news
Kolhapur: 'गाव सोडून जा, नाहीतर पत्नीवर बलात्कार करायला सांगेन'; मेन्यू कार्डवरून भांडण, चौघांनी दोघांना लोखंडी रॉडनं फोडलं

विठ्ठलाच्या भक्तांचा त्रास कधी संपणार?

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. मंदिर परिसरातील व्हीआयपी रस्त्यावर फेरीवाल्यांनी अक्षरश: बाजार मांडला आहे. या बाजारामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com